फडणवीसांचा फोटो ट्विट करुन अवताडेंनी सांगितले विजयाचे रहस्य

    03-May-2021
Total Views | 1082
samadhan awatade _1 



मुंबई -  
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या समाधान अवताडे यांनी आपल्या विजयाचे रहस्य सांगितले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा फोटो ट्विट करुन आमच्या यशाचे गमक हेच असल्याचे अवताडे यांनी सांगितलंय. दरम्यान रविवार रात्री आमदार झालेल्या अवताडेंनी सोमवार सकाळपासूनच थेट कामाला सुरुवात केली आहे. पंढरपूर येथे अधिकाऱ्यांच्या बैठक घेत कोरोना उपाययोजनांबाबत त्यांना सूचना दिल्या.
 
 
 
महाविकास आघाडीच्या नाकार टिच्चून समाधान आवताडे पंढरपूर- मंगळवेढा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले. या विजयाचे रहस्य सांगताना अवताडेंनी देवेंद्र फडणवीसांचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये फडणवीस क्वारंटाईन सेंटरचा आढावा घेत आहेत. हा फोटो ट्विट करुन अवताडे म्हणतात," हेच आमच्या कालच्या,आजच्या व उद्याच्या यशाचे गमक होते रहस्य आहे,अन् कायम राहील.....!!! ||सत्य सातत्य अन् सत्कार्य.....|| आमच्या आदर्श नेतृत्वाच्या पावलावरती पाऊल ठेवत यापुढे ही सदैव जनसेवेत कार्यरत राहीन हा शब्द देतो." दरम्यान सोमवारी सकाळपासून अवताडे यांनी मंगळवेढा आणि पंढरपूरमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. या दोन्ही क्षेत्रामध्ये वाढलेल्या कोरोना प्रसारावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी अधिकारी वर्गासोबत बैठक घेतल्या.
 
 
 
 
 

सोमवारी मंगळवेढा आणि नंतर पंढरपूर येथे अधिकाऱ्यांच्या बैठक घेत कोरोना उपाययोजनांबाबत अवताडेंनी त्यांना सूचना दिल्या. काल जरी आमदार झालो असलो तरी आनंद साजरा करायचा आणि जल्लोष करायची वेळ नसून कोरोनाचे संकट वाढत चालल्याने पहिल्यांदा त्याच्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आज सकाळीपासून कामाला सुरुवात केल्याचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले. सध्या पंढरपूर आणि मंगळवेढ्यात नागरिकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. कोविड केअर सेंटर देखील भरल्याने नवीन जागांची व्यवस्था उभी करण्याबाबत अवताडेंनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सध्यापंढरपूरमध्ये ऑक्सिजनचा फार मोठा तुटवडा जाणवत असून तीच अवस्था रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत होत आहे. त्यामुळे जादाचा साठा मिळवण्याबाबत प्रयत्न सुरु केल्याचे अवताडे यांनी सांगितले. माझ्याजवळ केवळ साडेतीन वर्षाचा कालावधी असल्याने पहिल्यांदा कोरोना संकट आणि नंतर पाणी प्रश्नासह इतर अडचणी सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कमी वेळ व जादा आव्हाने असल्याने वेळेचे नियोजन करत वेगाने कामे पूर्ण करण्यावर आपला भर राहणार असून जनतेचा विश्वास पूर्ण करण्याची जबाबदारी समर्थपणे पार पडणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121