सर्वात मोठी बातमी! 'या' वयोगटातील प्रत्येकाला मिळणार कोरोना लस

    24-Feb-2021
Total Views | 72

covid_1  H x W:

ज्येष्ठ नागरिकांसाठी करोना लसीकरणास मार्चपासून प्रारंभ



नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यास येत्या १ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. या टप्यात वय वर्षे ६० व त्यापुढील व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या ४५ वर्षे व त्यावरील नागरिकांना लस दिली जाणार आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारपरिषदेत बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.

 

करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या १ मार्चपासून प्रारंभ होणार असल्याचे केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी सांगितले. या टप्प्यामध्ये ज्येष्ठ नागरिक म्हणजे वयवर्षे ६० व त्यापुढील व्यक्ती आणि वयवर्षे ४५ च्या पुढील सहव्याधी असलेले नागरिक यांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी १० हजार खासगी आणि २० हजारांहून अधिक खासगी केंद्रांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सरकारी केंद्रांमध्ये लस विनामूल्य दिली जाणार असून खासगी केंद्रांचे शुल्क येत्या २ ते ३ दिवसात केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे जाहिर केले जाणार असल्याचेही जावडेकर यांनी सांगितले.

 

दरम्यान, लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत १ कोटी ६० लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे १४ लाख लाभार्थ्यांनी लशीची दुसरी मात्रादेखील घेतली आहे.

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121