नवी दिल्ली : तामिळनाडूतील हेलिकॉप्टर दुर्घटनेतून बचावलेले एकमेव अधिकारी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे निधन झाले. दुर्घटनेत जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर बंगळुरु येथील कमांड रुग्णालयात उपचार सुरु होते. या दुर्घटनेत बिपिन रावत यांच्यासह इतर १३ जणांचे निधन झाले. यावेळी फक्त वरुण सिंह हे या दुर्घटनेतून बचावले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी त्यांचे निधन झाले.
तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह १३ जणांचे निधन झाले. यावेळी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे एकमेव अधिकारी बचावलेले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी त्यांना ‘शौर्य चक्र’ प्रदान करण्यात आले होते.