'आत्मनिर्भर' भारताचे बिल गेट्स यांच्यातर्फे कौतूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2021
Total Views |
PM Modi _1  H x
 


भारताकडे लस उत्पादन करण्याची क्षमता : बिल गेट्स

वॉशिंग्टन : भारतात कोरोना लसीकरणाच्या मोठ्या मोहिमेची आता सुरुवात केली जाणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. देशभरात मोफत लसीकरण करण्याची ही मोहिम असून त्यासंदर्भात सरकारतर्फे सूचनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. १२० कोटी लोकांपर्यंत भारतीय बनावटीची ही लस पोहोचवण्याच्या या घोषणेचे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी कौतूक केले आहे.




संपूर्ण स्वदेशी लस भारतीयांसाठी पुरवण्याच्या या कामाची त्यांनी स्तुती केली आहे. कोरोना महामारीच्या विळख्यात संपूर्ण जग अडकले असताना लसीकरणाबद्दल होणारे संशोधन, लस उत्पादनाची क्षमता आणि याला मार्गदर्शन देणारे भारताचे नेतृत्व यामुळे कोरोना महामारीचे संकट हद्दपार होईल, अशी आशा बिलगेट्स यांनी व्यक्त केली आहे.



@@AUTHORINFO_V1@@