'त्या' युवकाने जपल्या कोट्यवधी हिंदूंच्या भावना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2020
Total Views |

bahrin_1  H x W



बहारीन :
भारतात हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानांचा अवमान करण्याचे प्रयत्न जिहादी तत्त्वांकडून केले जात असतानाच आखाती देशांमध्ये हिंदूंच्या देवतांची विटंबना करण्यात आल्याची चित्रफीत समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. बहारीनमधील एक दुकानांमध्ये असलेल्या गणेशमूर्ती दोन बुरखाधारी महिलांनी जमिनीवर फेकून त्या मूर्तीचे तुकडे तुकडे केल्याचे त्या चित्रफितीमध्ये दिसत होते. या चित्रफितीमध्ये दिसणाऱ्या त्या गणेश मूर्तींचे पुढे काय झाले हा प्रश्न सर्वानाच होता. या गणपतीच्या मूर्ती तोडल्याच्या एका आठवड्यानंतर सध्या बहारीनमध्ये राहणाऱ्या भारतीय तरुण दिव्य पांडेने या मूर्तींचे मनोभावे विसर्जन केले.




ऑप इंडियाशी बोलताना दिव्य पांडेने सांगितले की, हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यावर वारंवार ते धक्कादायक चित्र डोळ्यासमोर येत होते.हे धक्कादायक आहे की बहरीनमध्ये इतर धर्मियांचा आदर करण्याच्या बाबतीत खुले आहे. बहारीनचे लोक अतिशय मैत्रीपूर्ण आहेत आणि म्हणूनच बुरखा घालून आलेल्या महिलेने केलेला उद्रेक पाहणे माझ्यासाठी विलक्षण गोष्ट होती.” गणेश स्थापना तोंडावर असताना घरी गणपतीची मूर्ती घ्यायची त्यांची योजना होती. म्हणून त्यांनी त्या सुपरमार्केटशी संपर्क साधला व त्या मूर्ती विकत घेण्याची तयारी दर्शविली. ते म्हणतात, “त्या मूर्ती स्थापना व विसर्जन यांना पात्र आहेत. जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तेव्हा मी ते सुपरमार्केट त्वरित ओळखले कारण ते माझ्या घराच्या अगदी जवळ आहे. मी त्यांना विनंती केली की मला तुटलेल्या सर्व मूर्ती खरेदी करायच्या आहेत, त्यांची स्थापना व विसर्जन करणे आवश्यक आहे. तथापि, कायदेशीर कारवाईमुळे सुपरमार्केटने मला त्या मूर्ती देण्यास नकार दर्शविला.”





मात्र, दिव्य पांडेने यांना गणेश चतुर्थीला सुपर मार्केटमधून फोन आला की आता कायदेशीर कारवाईत मूर्तीं पुरावा म्हणून आवश्यक नसल्यामुळे ते येऊन त्यांना संकलित करू शकतात. अशावेळी क्षणाचाही विलंब ना करता त्यांनी त्या मूर्ती घरी आणल्या व त्यांची प्रतिष्ठपणा केली. ते म्हणतात की, घरात खंडित (तुटलेली) मूर्तीची स्थापना करु नये. मात्र यांना मी खंडित मुर्ती मानत नाही. या मूर्ती मुद्दाम तोडण्यात आल्या होत्या. म्हणून मी त्यांना घरी आणले व त्यांची स्थापना करत छोटी पूजा केली आणि विधिवत विसर्जन करुन या बाप्पाला निरोप दिला.

@@AUTHORINFO_V1@@