मनुवादी कुठले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Apr-2020   
Total Views |


jitendra awhad_1 &nb



माझे दुकान मनूच्या नावाने चालते. आता कोण मनू विचारू नका. मला तरी कुठे माहिती आहे, कोण मनू का बनू तो. पण असे काही बोललो की माझ्या बारामतीच्या विठ्ठलाला बरे वाटत असावे, असे मला वाटते. मनू-बिनू बोललो की आम्हा सर्वांना कसं पुरोगामी असल्यासारखं वाटते.


शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय भाजप नेत्यांचे दुकान चालत नाही
, असे मी म्हणालो. काय करणार बोलावे लागते. कुणाला नाही पण मला तर हे असे जास्तच बोलावे लागते. माझे पण तर दुकान असेच चालते. माझे दुकान मनूच्या नावाने चालते. आता कोण मनू विचारू नका. मला तरी कुठे माहिती आहे, कोण मनू का बनू तो. पण असे काही बोललो की माझ्या बारामतीच्या विठ्ठलाला बरे वाटत असावे, असे मला वाटते. मनू-बिनू बोललो की आम्हा सर्वांना कसं पुरोगामी असल्यासारखं वाटते. काय म्हणता बेअक्कल असल्यासारखे वाटते? असू द्या... असू द्या. मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. नाही तर लोक टपलेलेच आहेत हॅशटॅगकरायला की बोला चटकन, सांगा पटकन, हे बेअक्कल आहेत का?


तर काय सांगत होतो दुकानाबद्दल. माझेही दुकान मनू
, संविधान, भाजप, हिंदू, मोदी यांच्या नावाने चालते. काहीही बोलताना या सगळ्या शब्दांची फोडणी दिली की, बातमी झणझणीत झालीच समजा. तर काय राजकारण आहे मन मारावे लागते. काय म्हणता मला मन आहे का? काय भलतेच विचारता. किती उदाहरणे देऊ? मी खूप संवेदनशील आहे. पण माझी संवेदनशीलता पाहून काही लोक जळतात. आता बघा ना ती बिचारी गरीब पोर इशरत जहाँवारली तेव्हा तिच्या नावाने माझ्याच जहागिरीमध्ये रुग्णवाहिका फिरत होती. गेल्या वर्षी नक्षली समर्थक म्हणून अरुण परेरांना त्या मनुवादी सरकारने घरात स्थानबद्ध केले होते. त्यावेळी मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटलो. त्यांची ख्याली खुशाली विचारली. इतकेच काय, काही दिवसांपूर्वी शहापूरच्या एका आदिवासी, हा शब्द खरे म्हणजे मूलनिवासी कसा छान वाटतो, पण जाऊ दे आता आदिवासीच बोललेले बरे, तर त्या आदिवासीच्या घरी मी आणि माझ्या बापाने म्हणजे बारामतीच्या नाथाने कोंबडीचा रस्सा चापला. गरीबाघरी जेवलो. आणखीन किती संवेदनशीलता दाखवायची हो. जाऊ दे. हे कुणीही मनुवादी माझ्यासमोर काहीच नाहीत. मला माहिती असलेल्या लढवय्या शूर चांगल्या अफजल खानाचा इतिहासही त्यांना माहिती नाही. मनुवादी कुठचे! आता या विधानाला जोडून. संविधान बचाओ’, ‘मोदी हिटलर आहेतही वाक्य जोडता येतात का हे सध्या पाहतोय.


यावेळी ही राजकारण


केंद्र सरकार या असल्या गर्दीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात लष्कर पाठवणार होते. पण राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने याला नकार दिला. का दिला असावा
? कारण, लष्कर हे गर्दीच्या जिथे कोरोना पसरू शकतो, अशा ठिकाणी मुंबईमधील धारावी, रे रोड, मोहम्मद अली मार्ग, गोवंडी, कुर्ला, मानखुर्द, शिवाजीनगर, भिवंडीत तैनात होणार होते. पण लष्कराला तैनात करण्यास नकार दिला गेला. कोणताही अस्सल मुंबईकर जाणून आहे की, इथेच लष्कराला तैनात करण्याची तयारी का केली होती. इतर सामान्य वेळीही या भागातले जनजीवन कसे असते हे उघड आणि मुंबई-ठाण्याची भळभळती जखम आहे. सध्या दु:खाने आणि हतबलतेने म्हणावे लागते आहे की, कोरोनाच्या बाबतीत दुर्दैवाने महाराष्ट्र नंबर वनआहे. महाराष्ट्र पोलीस अक्षरश: जीवाची बाजी लावून अहोरात्र काम करत आहेत. पण तरीही, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे.


यावर उपाय म्हणून
१४ एप्रिलचा लॉकडाऊनवाढवून ३० एप्रिल करण्यात आला. कारण, सातत्याने वाढणारी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या. ती साखळी तोडण्यासाठी हा लॉकडाऊनवाढवण्यात आला म्हणे. याला कारण लोकांनी गर्दी करायचे काही कमी केले नाही. भाज्या घेण्यासाठी, किराणासामान घेण्यासाठी लोकांनी अशी गर्दी केली की पुन्हा कधी भाज्या किंवा वाणसामान मिळणारच नाही. लोक असे का वागतात, यावर त्यांचे म्हणणे आमचा विश्वासच नाही की कोणी आमच्यासाठी काही करेल. उद्या सगळेच बंद केले तर कुणी घरी येऊन भाजीपाला, वाणसामान देणार आहे का? आमचे आणि आमच्या पोराबाळांचे हाल होणारच ना. लोकांना असे का वाटते? की महाविकास आघाडी सरकारवर लोकांचा विश्वास नाही का? तसेच दुसरीकडे रस्त्यावरचे नव्हे पण एकत्रित होणारे नमाज थांबले का? खूपशा वस्त्या तर अशा की तेथील कष्टकरी जीवांना सक्तीची विश्रांती आहे. तेथील दृश्य काय आहे? तेथील जीवन पूर्वीसारखेच आहे. कोरोना थांबणार कसा? फक्त लॉकडाऊनवाढवून थांबणार? तसेच मूळ प्रश्न असा की, लष्कराला का थांबवण्यात आले. केंद्र सरकारचा हस्तक्षेप नको असावा, हे इतर वेळी ठीक होते. पण महाराष्ट्रात त्राही असताना महाविकास आघाडी सरकारचे राज्य राज्य खेळणे म्हणजे अतीच राजकारण झाले.

@@AUTHORINFO_V1@@