शाह फैसल यांच्यावर पीएसए कायद्यान्वये कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Feb-2020
Total Views |

shah faizal_1  



नवी दिल्ली
: माजी भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आणि जम्मू काश्मीर पिपल्स मूव्हमेंट पक्षाचे अध्यक्ष शाह फैसल यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत (Public Safety Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएएस पदाची नोकरी सोडून शाह फैसल यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली होती.


संसदेने जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर शाह फैसल यांना गेल्या १४ ऑगस्ट २०१९ रोजी सीआरपीसी कलम १०७ नुसार ताब्यात घेण्यात आले होते. परदेशी जाण्याची बंदी घालत शाह फैजल यांना दिल्ली विमानतळावर ताब्यात घेऊन काश्मीरमध्ये परत धाडण्यात आले होते. त्यानंतर त्यांना एमएलए हॉस्टेलमध्ये ठेवण्यात आले. पीएसए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर आता शाह फैसल यांना त्यांच्या घरी हलवण्यात येणार की एमएलए हॉस्टेलमध्येच ठेवणार हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.



पीएसए कायदा काय आहे ?
सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत (Public Sequrity Act - PSA) हा जम्मू काश्मीरचा एक विशेष कायदा आहे. हा कायदा १९७८ मध्ये फारुक अब्दुल्ला यांचे वडील शेख अब्दुल्ला यांनी लागू केला होता. देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणत्याही व्यक्तीला ताब्यात घेण्याचा अधिकार राज्य सरकारला या कायद्याने दिला गेलाय. कोणत्याही व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध खटला चालवल्याशिवाय दोन वर्षांपर्यंत तुरुंगात ठेवण्याचा अधिकार या कायद्याद्वारे राज्य सरकारला देण्यात आलाय.
@@AUTHORINFO_V1@@