युवाशक्तीचा सेवाभावी आविष्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Dec-2020   
Total Views |

shantanu agasti_1 &n



‘कोविड’च्या संकटात गरजूंना खर्‍या अर्थाने मदतीचा हात मिळाला तो म्हणजे युवकांचा. अनेक युवा संघटना आपल्याला या काळात रस्त्यावर उतरलेल्या दिसल्या. ‘भारतीय जनता युवा मोर्चा’ही यामध्ये कुठेही मागे राहिला नाही. खास करून मोर्चाचे उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष शंतनू अगस्ती यांनी या काळात धडाडीने काम केले. त्यांनी या कोरोनाच्या संकटसमयी केलेल्या विविध कामांचा आढावा घेणारा हा सविस्तर लेख...


शंतनू अगस्ती
राजकीय पक्ष : भारतीय जनता युवा मोर्चा
पद : उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष
कार्यक्षेत्र : उत्तर पश्चिम मुंबई
संपर्क क्र. : ९८२०५५५५२८



कोरोनाच्या संकटात गरजूंसाठी धावत गेलेल्या युवाशक्तीची ताकद खर्‍या अर्थाने जगाला दिसली. भारताच्या मजबुतीसाठी युवकांना एकजूट करून त्यांचे सशक्तीकरण करणारी एक संस्था म्हणजे ‘भारतीय जनता युवा मोर्चा’ अर्थात ‘भाजयुमो’. ‘प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वत:’ या भारतीय जनता पक्षाच्या तत्त्वानुसारच काम करणारी ‘भाजयुमो’ कोरोना संकटातही गरजू व्यक्तींच्या मदतीला धावली. या संघटनेचे कार्यकर्ते जनसामान्यांसाठी झटले. यामधीलच एक हाडाचा कार्यकर्ता म्हणजे शंतनू अगस्ती. ‘भाजयुमो’च्या उत्तर पश्चिम मुंबईचे जिल्हाध्यक्ष असणार्‍या अगस्तींनी कोरोनाकाळात नियोजनात्मक पद्धतीने संकटात सापडलेल्या नागरिकांची मदत केली. समाजमाध्यमांचा पुरेपूर वापर करून तळागाळातील लोकांपर्यंत मदत पोहोचविण्याचे काम केले. ‘कोविड’काळात केलेल्या उल्लेखनीय जनसेवेमुळेच एक सामान्य कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्षपदापर्यंतच्या अगस्तींच्या प्रवासाला झळाली मिळाली आहे.



अगस्ती हे २०१३ साली एक सामान्य कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता युुवा मोर्चा संघटनेचे सदस्य झाले. २०१४ साली पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी मेहनत केली. त्याचवर्षी पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अंधेरी पश्चिम येथील दोन विभागांची जबाबदारी त्यांच्यावर होती. या विभागांमधून २५ वर्षांत प्रथमच भाजपचा उमेदवार निवडून आला. अगस्तींच्या या कामामुळे त्यांना २०१४च्या अखेरीस भाजयुमोच्या मुंबई उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. २०१७च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही त्यांनी पक्षाचे काम केले. यावेळी त्यांना जबाबदारी दिलेल्या वार्ड क्रं. ६०, ६७, ६८ आणि ८४ मधून पालिका निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच भाजपचे उमेदवार विजयी झाले. २०१८ साली त्यांना पक्षाने उत्तर पश्चिम मुंबईच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. गेल्या दोन वर्षांपासून ते या पदावर यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. ‘लॉकडाऊन’च्या पहिल्याच आठवड्यात संघटनेच्या जिल्हा विभागांप्रमाणे ३६ टीम तयार करण्यात आल्या. यामध्ये अगस्ती हे स्वत: उत्तर पश्चिम मुंबईच्या रस्त्यांवर उतरून कार्यकर्त्यांच्या मदतीने ‘कोविड स्वयंसेवक’ म्हणून काम करू लागले. ‘लॉकडाऊन’च्या सुरुवातीच्या काळात कोरोनाबाधित लोकांना रुग्णालयात भरती करण्यामध्ये समस्या निर्माण होत होत्या. या समस्यांकडे लक्ष केंद्रित करून अगस्ती यांनी काम करण्यास सुरुवात केली. कोरोनाबाधितांना रुग्णालयांमध्ये भरती करणे, अतिदक्षता विभागात त्यांची सोय करणे, ‘कोविड सेंटर’मधील जागांनुसार कोरोनाबाधितांचे नियोजन करण्याचे काम त्यांनी नेटाने केले.


आरोग्य समस्यांबरोबर लोकांसमोर दैनंदिन जीवनातील समस्याही उभ्या ठाकल्या होत्या. समाजाच्या काही घटकातील व्यक्ती गरजूंना मदत करू इच्छित होत्या. मात्र, ‘लॉकडाऊन’मुळे त्यामध्ये अनेक बंधने होती. अगस्ती यांनी वैयक्तिक पातळीवर ‘फूड फॉर निडी’ ही मोहीम राबवून समाजातील या दोन्ही घटकांतील लोकांमध्ये नियोजन आणण्याचे काम केले. इच्छुकांकडून केवळ अन्नधान्य स्वरूपाची मदत स्वीकारून ती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात आले. या माध्यमातून जवळपास दहा हजार किलो अन्नधान्य गरुजू लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले. याचदरम्यान तांदळापासून संपूर्ण शिधेचा समावेश असलेल्या ‘मोदी किट’वाटपाची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर टाकली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने असलेल्या या किटचे वाटप तळागाळातील लोकांपर्यंत होणे गरजेचे होते. या किटमध्ये साधारण २० दिवसांपर्यंत पुरेल इतक्या शिधेचा समावेश होता.



shantanu agasti_1 &n


‘कोविड’ महामारीच्या या काळात माझ्या प्रेरणेचे मुख्य स्रोत म्हणजे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी. कोरोनाच्या या महामारीच्या काळातही या दोन्ही व्यक्ती रात्रीचा दिवस करून जनसेवेसाठी धडपडत होते. त्यांच्याकडून सातत्याने काम करण्याची प्रेरणा आम्हा कार्यकर्त्यांना मिळत असते, त्यामुळेच आम्ही झपाटून काम करत आहोत.


अगस्ती यांनी भाजयुमोचे मुंबई अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवानांच्या मदतीने उत्तर पश्चिम जिल्ह्यातील लोकांपर्यंत हे किट पोहोचवून त्यांची मदत केली. ‘लॉकडाऊन’च्या दुसर्‍या टप्प्यात आत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्याची परवानगी होती. अशा परिस्थितीतही कोरोनाच्या भीतीमुळे अन्नसामग्री क्षेत्रातील अनेक विक्रेते आपली सेवा देण्यास धजावत होते. त्यामुळे लोकांना दररोजच्या भाजीपाला खरेदीमध्ये समस्या निर्माण होत होत्या. या समस्येबाबत उत्तर पश्चिम मुंबईतील गृहनिर्माण संस्थांच्या सचिवांनी अगस्तींशी संपर्क साधला. यावेळी भाजीपाला विक्रेत्यांशी तातडीने संपर्क साधून ‘व्हेजिटेबल व्हॅन’च्या माध्यमातून लोकांपर्यंत भाजीपाला पोहोचविण्याचे नियोजन अगस्ती यांनी केले. शिवाय, जे ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडू शकत नव्हते, त्यांच्यासोबत संपर्क साधून त्यांची औषधे आणि शिधा आणण्याचे काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आले. याचकाळात रा. स्व. संघाच्या माध्यमातून चालविण्यात येणार्‍या ‘कम्युनिटी किचन’च्या माध्यमातून खाद्य पाकिटे देण्यात येत होती. साधारण दीड महिना या पाकिटांचे विभागामधील गरजूंना वाटप करण्याचे व्यवस्थापन अगस्ती यांनी केले.

‘लॉकडाऊन’च्या काळात सगळेच जण समाजमाध्यमांनी एकमेकांशी जोडले गेले होते. नेमक्या या गोष्टीचा उपयोग अगस्तींनी लोकसेवेसाठी केला. ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅपच्या प्रचारासाठी सर्वप्रथम ते व्हॉट्स अ‍ॅप ग्रुुपच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी जोडले गेले. त्यानंतर याच माध्यमाच्या वापर करून जनसामान्यांपर्यंत हे अ‍ॅप पोहोचविण्यात आले. ‘लॉकडाऊन’च्या तिसर्‍या टप्प्यात म्हणजेच जून-जुलै महिन्यांत महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला होता. त्याच अनुषंगाने उत्तर पश्चिम मुंबई विधानसभा क्षेत्रांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांच्या माध्यमातून ५०० युनिट रक्तांचे संकलन करून त्याचा रक्तपेढ्यांना पुरवठा करण्यात आला. ‘लॉकडाऊन’ वाढत गेल्यानंतर मजुरांचे स्थलांतर सुरू झाले. या स्थलांतरासाठी मजुरांची पोलिसांकडे नोंदणी सुरू झाली. नोंदणी प्रक्रियेकरिता पोलिसांना मनुष्यबळ कमी पडू लागले. अशावेळी अगस्ती यांनी पोलिसांच्या मदतीसाठी कार्यकर्त्यांना उभे केले. पोलीस स्थानकांमध्ये कार्यकर्त्यांना पाठविले. कार्यकर्त्यांनी मजुरांच्या नोंदी करून दिल्या. या माध्यमातून सुमारे १५ हजार मजुरांच्या नोंदी करण्यात आल्या. स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न या कालावधीत मूलभूत होता. विभागातील नागरिक वस्त्यांच्या स्वच्छतेसाठी १०० लीटर सॅनिटायझरचे वाटप यासाठी करण्यात आले. ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमियोपॅथीच्या औषधांचे वाटपही यावेळी करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा करण्यात आलेल्या ‘सेवा सप्ताह’ कार्यक्रमातही प्रामुख्याने आरोग्य विषयक शिबिरांचे आयोजन त्यांनी केले होते. ही सर्व कामे करताना अगस्तींना नेहमीच कार्यकर्त्यांची मदत मिळाली आहे, त्यामुळेच त्यांनी नियोजित केलेल्या कामांना आकार मिळून ती कामे लोकहिताची झाली आहेत.
@@AUTHORINFO_V1@@