रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2020
Total Views |

arnab_1  H x W:


मुंबई :
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना त्यांच्या वरळीतील घरातून ताब्यात घेतलं असून ते अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही आरोपही अर्णब यांनी केला आहे. 



रायगडच्या अलिबाग येथे इंटिरियर डिझाईनर अन्वेय नाईक यांनी आत्महत्या केली होती, या आत्महत्येसाठी अर्णब गोस्वामी यांनी प्रवृत्त केल्याचा आरोप नाईक कुटुंबीयांनी केला होता. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. कलम ३०६ च्या अंतर्गत पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली असल्याची माहिती आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना अटक केली. अर्णब यांना अलिबागच्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अर्णब गोस्वामी म्हणाले की, मला औषधेही घेऊन दिली नाहीत, मला पोलिसांकडून मारहाण झाली असल्याचा आरोप अर्णबने केला. समोर आलेल्या व्हिडिओतदेखील पोलीस अर्णव यांना ओढत घेऊन जाताना दिसत आहे. तसेच पोलिसांनी पत्नी व मुलीला पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचं आरोपही केला आहे. अर्णव यांची लीगल टीम आता हायकोर्टात व सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे कळते.
@@AUTHORINFO_V1@@