आयआयटी मुंबईचा ५७ वा दीक्षांत सोहळा संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Aug-2019
Total Views |


 

मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा (आयआयटी मुंबई) ५७ वा दीक्षांत सोहळा आज आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सभागृहात पार पडला. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल 'निशांक' प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांचे प्रमुख भाषण झाले.

शिक्षणाच्या अस्त्राचा वापर करून विद्यार्थी आपल्या तसेच कुटुंबाच्या आणि समाज जीवनात परिवर्तन घडवू शकतात असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. पदवीदान सोहळा हा महत्वपूर्ण प्रसंग असून यानंतर विद्यार्थी शिक्षणाची फळे बाहेरील जगापर्यंत पोहचवण्याच्या प्रवासाला निघतात असे ते म्हणाले. संस्कृती आणि शिक्षण यांची सांगड घालायला हवी जेणेकरून त्या व्यक्तीला विकासासाठी मजबूत पाया उपलब्ध होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्टॅन्ड अप इंडिया सारख्या कार्यक्रमांचा उल्लेख करून ते म्हणाले की या परिवर्तन घडवून आणणाऱ्या योजना आहेत . भारत आता जगातील पसंतीचे गुंतवणूक केंद्र बनला आहे असे ते म्हणाले. शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. आपल्या जन्मदिनी दरवर्षी एक रोपटे लावण्याचे जल संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावर्षी पदवी प्रदान करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ३०१* पीएचडी, २७* दुहेरी पदवी (MTech/MPhil+PhD) आणि ३५* दुहेरी पदवी (MSc+PhD).विद्यार्थी आहेत. यापैकी ३८ संशोधक विद्यार्थ्यांची २०१७-१९ वर्षासाठी पीएचडी संशोधनात सर्वोतकृष्ट म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय २३ संयुक्त पीएचडी पदव्या मोनाश विद्यापीठाच्या सहकार्याने प्रदान करण्यात आल्या, कुलगुरू आणि मोनाश विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा. मार्गारेट गार्डनर यांनी हे पुरस्कार प्रदान केले. याशिवाय १२ एमएस (संशोधन) , 6 दुहेरी पदव्या (MSc+MTech), ५७६ एमटेक, ५६ एमडी, २७ एमफिल, ११० MMgt, २२६ दोन-वर्षे एमएस्सी पदव्याही प्रदान करण्यात आल्या.

@@AUTHORINFO_V1@@