बॅंकेत रक्कम भरण्यासाठी ‘आधार’ आवश्यक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jul-2019
Total Views |

 

नवी दिल्ली : बाजारातून चलनी नोटा कमी करणे व डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आता बॅंकांमध्ये विशिष्ट रक्कम भरणा करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक करण्यात येणार आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अशा पडताळणीसाठी आधार क्रमांक नोंदणीकृत असलेल्या क्रमांकावर वन टाइम पासवर्ड (OTP) देण्यात येईल, अशी तरतूद करण्यात येणार आहे.

 

बॅंकेतील रोख व्यवहारांवर आधार क्रमांक पडताळणीची नियमावली लागू करण्यासाठी किमान रक्कमेची मर्यादा ठरवण्यात येणार आहे. ही मर्यादा २० ते ३० लाखांपर्यंत असू शकते. याद्वारे कमी रक्कमेच्या व्यवहारांना धक्का न लावता मोठ्या रक्कमेच्या व्यवहारांना शोधणे हे मुख्य काम सरकार करणार आहे. सद्यस्थितीत मोठ्या रक्कमांच्या व्यवहारांसाठी पॅनकार्ड क्रमांक आवश्यक करण्यात आला आहे. अर्थमंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, परदेशी चलनांच्या व्यवहारांवर आधार क्रमांक अनिवार्य केला जाणार आहे.

 

प्रॉपर्टीच्या व्यवहारांवरही हवा आधार

 

एका अहवालानुसार, रोख व्यवहारांवर एक निश्चित मुल्यापेक्षा अधिक किमतीच्या घर किंवा गाळे खरेदीवर आधार पडताळणी अनिवार्य केली जाऊ शकते. काहीजण व्यवहार करत असताना बनावट पॅन क्रमांक वापरत असल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा बदल करण्याचा विचार केंद्र सरकार करणार आहे. यासाठी आधार क्रमांक पडताळणी आवश्यक केली जाणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat



@@AUTHORINFO_V1@@