मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला ते सायन स्थानकांदरम्यान रोड ओव्हर पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शनिवार आणि रविवारी रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते कुर्ला दरम्यान अप आणि डाउन धिम्या-जलद मार्गावर रात्री १ ते पहाटे ४ वाजेपर्यत गर्डरचे काम करण्यात येणार आहे. परिणामी डाउन मार्गावरील रात्री १२.१८ आणि १२.३१ची सीएसएमटी ते ठाणे-कुर्ला लोकल, अप मार्गावरील कुर्ला ते सीएसएमटी पहाटे ५.५४ची लोकल रद्द करण्यात आलेली आहे. शनिवारी रात्री ११.१२ची कल्याण-सीएसएमटी लोकल कुर्ला स्थानकापर्यतच चालविण्यात येणार आहे. तर अंबरनाथ-सीएसएमटी रा.१०.०१ ची लोकल ठाणे स्थानकापर्यत धावणार आहे.
वाडीबंदर यार्ड अद्यावतिकरणः नवीन पिट लाइन कार्यान्वित करण्यासाठी दिनांक ३.४.२०१९ ते ९.४.२०१९ पर्यंत लांब पल्ल्यांचा गाड्या रद्द करण्यात येतील. प्रवाशांना होणार्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. अधिक माहितीसाठी... pic.twitter.com/XY4S4zltp8
— Central Railway (@Central_Railway) March 16, 2019
आसनगाव ते कसारा दरम्यान ओव्हरहेड वायरचे जाळे आणि पादचारी पुलाचा गर्डर टाकण्याकरिता रविवारी सकाळी १०.५० ते दु.१२.५० वाजेपर्यंत अप-डाउन मार्गावर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान आसनगाव ते कसारा दरम्यानची अप-डाउन मार्गावरील लोकल वाहतूक बंद असणार आहे. सीएसएमटी-कसारा स.९.४१, स.१०.१६ची लोकल आसनगाव पर्यतच धावणार आहे. कसारा-सीएसएमटी स.११.१२,दु १२.१९ च्या लोकल आसनगाव स्थानकातुन अनुक्रमे स.११.४९,दु.१२.५६ वाजता चालविण्यात येणार आहेत. रविवारी ५११५३-५४ मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर, १२११७-१८ एलटीटी-मनमाड-एलटीटी गोदावरी एक्सप्रेस रद्द केलेल्या आहेत. ११०२६ पुणे-भुसावळ एक्सप्रेस दौण्ड-मनमाड मार्गे धावणार आहे.
पायाभूत सुविधा उन्नतीकरणः दिनांक १६/१७.३.२०१९ आणि १७/१८.३.२०१९ मध्यरात्री 01.00 वा पासून सकाळी 04.00 वा. पर्यंत कुर्ला आणि शीव स्थानकादरम्यान रोड ओव्हर ब्रीज (ROB) गर्डर लाॅंचिंगसाठी ब्लाॅक. pic.twitter.com/tHVOH3XPo3
— Central Railway (@Central_Railway) March 16, 2019
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat