कारगिलच्या बहादूर 'मिग २७ला अखेरचा निरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2019
Total Views |


saf_1  H x W: 0


जयपूर : भारतीय हवाई दलात गेली चार दशके सोनेरी प्रवास केलेले मिग-२७ बहादूर शुक्रवारी सकाळी शेवटचे उड्डाण केले. परंपरेप्रमाणे त्यांना शुक्रवारी खास हवाई प्रदर्शन करून निरोप देण्यात आला. जोधपुरवरील एअर बेसवर हा सोहळा झाला. यावेळी मिग २७ चालवलेल्या सर्व वैमानिकांना बोलवण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये सोहळा पार पडला.

 

'मिग-२७' हे भारतीय हवाई दलातील लढाऊ विमान हवेतून जमिनीवर मारा करणारे सर्वोत्तम विमान आहे. १९८१ साली पहिल्यांदाच 'मिग-२७' विमान भारतीय हवाई दलात दाखल झाले होते. तब्बल १७०० किमी प्रतितास इतका तुफान वेग असलेल्या या विमानाची चार हजार किलो वजनाची शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे.

 

दरम्यान, या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक तृटींमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. गेल्या १० वर्षात विमान अपघाताच्या एकूण घटनांमध्ये सर्वाधिक मिग-२७ याच लढाऊ विमानांचा समावेश होता. हवाई दलातील सुत्रांच्या माहितीनुसार, या विमानातील तांत्रिक अडचणी दूर करणे शक्य झाले नाही. त्यामुळे जवळपास तीन वर्षांपूर्वी या विमानांना हवाई दलाच्या ताफ्यातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.

@@AUTHORINFO_V1@@