महापौर निवडणुकीसाठी भाजप-साई पक्षाचा व्हीप जारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Nov-2019
Total Views |



उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक शुक्रवारी होणार असून खबरदारी म्हणून भाजप व साई पक्षाच्यावतीने आपल्या नगरसेवकांना ‘व्हीप’ जारी केला आहे. तसेच उल्हासनगरातील स्थानिक साई पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्याची माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी होणार्‍या महापौर निवडणुकीचे वातावरण तापले असून पडद्यामागे अनेक घडामोडी सुरू आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष गटागटाने आपापले नगरसेवक घेऊन अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. साई पक्षाचे प्रमुख जीवन ईदनांनी यांनी आपल्या १२ नगरसेवकांना घेऊन साई पक्षाचा गट भाजपमध्ये विलीन केला आहे. साई पक्षाचे १२ नगरसेवक व भाजपचे ३१ नगरसेवक आहेत. साई पक्ष व भाजपने ‘व्हीप’ जारी करून महापौरपदासाठी जीवन ईदनानी यांना, तर उपमहापौरपदासाठी विजू पाटील यांना मतदान करण्याचे सूचित केले आहे. दुसरीकडे शिवसेना- काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा जोमाने तयारीला लागली आहे. विधानसभा निवडणुकीत दुखावलेले ओमी कलानी टीम भाजप विरोधात मतदान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमच्या बाजूने ११ नगरसेवक असल्याचे त्यांचे निकटवर्तीय बोलत आहेत. एकूणच परिस्थिती अस्पष्ट असून खरे चित्र निवडणुकीदरम्यान स्पष्ट होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@