आरे वृक्षतोडीविरोधात गोंधळ घालणाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

    05-Oct-2019
Total Views | 50



 २९ जणांना न्यायालयीन कोठडी 

 

मुंबई ( प्रतिनिधी) - आरेमधील 'मेट्रो-३' कारशेडसाठी सुरू करण्यात आलेल्या वृक्षतोडीविरोधात गोंधळ घालणाऱ्या २९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामधील काही जणांची रवानगी ठाणे येथील तुरुंगात करण्यात आली आहे. बोरिवली येथील प्रथम न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला.

 

मुंबई उच्च न्यायालयाने आरे संदर्भातील सर्व याचिका शुक्रवारी बरखास्त केल्या. त्यानंतर 'मेट्रो-३' प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी आरेमधील कारशेडसाठी आवश्यक असणारी झाडे तोडण्यास सुरुवात केली. मात्र, या कामाला पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला. शुक्रवारी मध्यरात्री मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी लोक याठिकाणी दाखल झाले. त्यांनी पोलीसांना न जुमानता नियोजित कारशेडच्या ठिकाणी शिरकाव केला. विनापरवाना बेकायदेशीररित्या जमलेल्या १०० ते २०० लोकांनी पोलीसांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला, असे मुंबई पोलिसांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. तसेच त्यामधील काही लोकांनी पोलीस शिपाई इंगळे यांना हाताने मारहाण करुन त्यांना दुखापत होण्यास कारणीभूत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणी पोलिसांनी २९ जणांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यामध्ये २३ पुरूष व ६ महिलांचा समावेश आहे. शनिवारी दुपारी त्यांना बोरिवलीतील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी या सर्व २९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामधील पुरुष आरोपींना ठाणे तुरुंगात पाठविण्यात आले आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121