भय आणि आशामधील ‘पारा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2019
Total Views |



मानसोपचारतज्ज्ञ
, बालरोगतज्ज्ञ नेहमी सांगतात की, लहान मुलाला भीती वाटत नाही. आपण म्हणजे मोठी माणसे त्याला भयाचीवा भीतीचीजाणीव करून देतो. त्याच वयापासून भीतीनावाच्या स्थितीचा आणि आपला परिचय वृद्धिंगत होत जातो. पाराम्हणजे आमचा प्रथितयश चित्रकार आणि सर जे. जे. स्कूलचा ज्येष्ठ कलाध्यापक ज्याचं कागदोपत्री नाव राजेंद्र पाटीलअसं आहे. पाराहे नाव अर्थात टोपणनाव. पण हे नाव कसं पडलं, हा प्रश्न मी कदाचित त्याला विचारणारही नाही. कारण, ‘पाटीलचा पाआणि राजेंद्रचा राअसा पाराबनला असेल, अशी मी रास्त समजूत करून घेऊन पाराच्या कलाकृतींचा आशय शोधण्याचा प्रयत्न या लेखात करणार आहे.

‘Between Hope And Fear’ या मथळ्याखालील चित्रकार पाराचे हे प्रदर्शन सध्या जहांगिर कलादालनात सुरू आहे. त्रिमितीकार, ‘इन्स्टलेशनआणि अमूर्त कलाकृती असा त्रिवेणी संगम सुरू आहे जहांगिरमध्ये!

पारापकडता येत नाही. मात्र, तो टेम्प्रेचरसांगण्याचं काम चोख बजावतो. तसंच मला आमच्या कलाकार पाराच्या कलाकृतींबद्दल वाटत असते. पाराच्या कलाकृती जेवढ्या महाकाय असतात, जेवढ्या विशुद्ध रंगांनी समृद्धवान वा ऐश्वर्यवान बनलेल्या असतात, तेवढ्याच त्या गूढअसतात. अनाकलनीय असे मी म्हणणार नाही. मात्र, त्यांचा आशय शोधण्याचा प्रयत्न केला, तर तो हाती लागत नाही. त्या मर्क्युरीअर्थात पार्‍याप्रमाणे...! आपण ज्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहतो, त्याहून अधिक काहीसे त्याच्या कलाकृती बोलत असतात.

मला आठवतं, एकदा ज्येष्ठ चित्रकार म्हणाले की, आपणास कलाकृती का आवडते? किंवा आपणास एखादी कलाकृती का आवडते? तर त्या कलाकृतीला आपण आवडत असतो. म्हणून...! हे विधान ऐकायला-वाचायला सुलभ वाटत असलं तरी ते गूढतेकडे घेऊन जाणारं आहे.

कुठलाही कलाकार हा अपघातातूनच सृजन निर्माण करू शकतो, हे आचार्य रजनिश यांनी सांगितले आहे. कलाकार नेहमीच अस्वस्थ राहिला, तरच तो कलारसिकांना अश्वस्थकरू शकतो. पाराची प्रत्येक कलाकृती ही या प्रकारात मोडणारी वाटते. भयानंतरच आशा निर्माण होते, असे काही अभ्यासक म्हणतात. भयआणि आशाया केवळ सृजनशील आणि प्रयोगशील अशा व्यक्तीच्या बाबतीतच आढळून येणार्‍या स्थितीकिंवा अवस्थाआहेत.

पाराउर्फ राजेंद्र पाटील हे प्रयोगशील आणि ग्रामीण संस्कारांतून घडलेले कलाकार आहेत. त्यांचे अमूर्त आकार खूप काही सांगून जातात. ते आकार निरागस असण्याचा आभास त्यांच्या कलाकृतीतून दिसतो. तोच विचार त्यांच्या त्रिमिताकारांमध्ये दिसतो.

उंचावरील देव अथवा उंचीवरील ध्येय गाठण्यासाठी खाली पायथ्याशी थांबून चालत नाही. तो डोंगर चढावाच लागतो आणि पूर्ण चढण चढून झाल्यानंतर देवदर्शन होते. तसं पाराच्या कलाकृती पाहताना घडत असावं असं वाटतं. पाराच्या कलाकृती या भयआणि आशेच्या हिंदोळ्यापासून अडथळे असणारे ट्रेकिंग करून उच्च शिखरावर पोहोचलेले आहेत. शिखर गाठण्याशिवाय त्याची ओळख होत नसते. कलाकाराच्या कलाकृती समजण्याशिवाय त्या कलाकाराला समजून घेणं महत्त्वाचं असतं, असं मला वाटतं. पाराअर्थात राजेंद्र पाटील हे अशाच एका प्रयोगशाळेतील कलाकाराचे नाव. त्याच्या चित्रांचे प्रदर्शन दि. ८ ते १४ ऑक्टोबरपर्यंत जहांगिरमध्ये सुरू आहे.

- प्रा. गजानन शेपाळ

@@AUTHORINFO_V1@@