देशातील सर्वात मोठा रोप-वे मुंबईत !

    18-Nov-2018
Total Views | 33
 

मुंबई : देशातील सर्वात मोठा रोप-वे मुंबईत बांधला जाणार असून मुंबई पोर्ट ट्रस्टने त्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट शिवडी ते जागतिक वारसा असलेल्या एलिफंटा बेटादरम्यान ही रोप-वे सेवा सुरू राहणार आहे. या प्रकल्पासाठी पोर्ट ट्रस्ट जागतिक निविदा मागवणार आहे. रविवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी केंद्रीय भूपृष्ठ व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वॉटर फ्रंटवर अनेक कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. त्यामध्ये विविध प्रकल्पांसाठीच्या निविदा कामाला सुरुवात करण्यात आल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

 

मुंबई ते घारापुरी येथील एलिफंटा बेटापर्यंतचे आठ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी केवळ १४ मिनिटे लागणार आहेत. सध्या हेच अंतर बोटीने पार करण्यासाठी एक तास लागतो. हा देशातील पहिला समुद्रातील रोप-वे ठरणार आहे. केंद्र सरकारच्या स्थायी वित्त समितीने या रोप वेला परवानगी दिलेली आहे. ऑक्टोबर २०२२पर्यंत या रोप-वेचे संपूर्ण काम होऊन ही सेवा सुरू होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत दोन तरंगत्या हॉटेलांचे उद्घाटन केले. अशा प्रकारची हॉटेल्स देशासह परदेशातही लोकप्रिय आहेत. सार्वजनिक, खासगी कार्यक्रम आणि अन्य औद्योगिक क्षेत्रासाठी ही हॉटेल्स उपलब्ध असणार आहेत. यावेळी देशातील सर्वात मोठ्या रोप-वेच्याही निविदा प्रक्रिया मागवणार असल्याची घोषणा करण्यात आली. शिवडी ते घारापुरी येथील लेण्यापर्यंत ही सेवा सुरू राहणार आहे. या कामासाठी ६०० कोटींची तरतूद असून २०२० पर्यंत याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. ८.३ किमी लांबी असलेला हा रोप-वे १५० मीटर उंचीवर बांधण्यात येणार आहे. एक टोक शिवडी, तर दुसरे टोक हे एलिफंटा लेण्यांपर्यंत असणार आहे. रविवारी गडकरी यांनी रोप-वेसाठीच्यानिविदेची घोषणा केली आहे.

 

बंदरावर अत्याधुनिक रुग्णालयासाठी ६९३ कोटी

 

६०० खाटांचे अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असे रुग्णालय बांधले जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. बंदरावर काम करणार्‍या सुमारे ४५ हजार कर्मचार्‍यांवर उपचार करता येणे शक्य होईल. यासाठी ६९३ कोटींचा निधी मंजूर केला जाणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121