राज्यात शिवसेनेत पक्ष प्रवेशाची लाट सुरू असून शनिवारी ठाण्यातील आनंद आश्रम येथे कल्याण लोकसभेतील प्रभावी पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडलेल्या या प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ विभागातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली आहे.
Read More
प्रयागराजच्या करेली परिसरात मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या पुढाकाराने मुस्लिम समाजातील बंधू-भगिनींना मोठ्या उत्साहात रक्षाबंधन उत्सव साजरा केला. या प्रसंगी उपस्थितांनी परस्परांमधील बंधुता आणि प्रेम वृद्धिंगत करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमात मुस्लिम समाजातील महिलांनी रक्षासूत्र बांधून पारंपरिक नात्याच्या मजबुतीचे प्रतीक सादर केले व एकमेकांच्या सुरक्षेचे आणि सन्मानाचे वचन दिले. यावेळी आयोजक म्हणाले, रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही, तर देशाच्या अखंडतेचा आणि परस्पर विश्वासाचा प्रतीक आहे.
निवडणुकीत सातत्याने होणार्या काँग्रेसच्या पराभवाचे खापर वारंवार निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर फोडण्याचा बालिशपणा आता राहुल गांधींनी थांबवावा. त्याऐवजी काँग्रेसमधील संघटनात्मक बदलांवर त्यांनी एवढीच ऊर्जा दवडली असती, तर आज आयोगाकडे बोट दाखवण्याची वेळच आली नसती. एकेकाळी याच काँग्रेस पक्षाकडे कार्यकर्त्यांचे मोहोळ होते. पण, आज त्याच काँग्रेसकडे निवडणूक काळात बुथवर बसण्यासाठीही कार्यकर्त्यांची वानवा! असे होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे, नेहरु-गांधी घराण्याने पक्षावर लादलेली घराणेशाही आणि परिणामी काँग्रेसने गमाव
आज cपहायला पु.ल, विजय तेंडुलकर, कमलाकर सांरंग असायला हवे होते. त्यांनी मॅड सखारामचा प्रयोग नक्की एन्जॉय केला असता.
केएसआर बेंगळुरू रेल्वे स्थानकावरून 'अजनी नागपूर-पुणे' वंदे भारत, 'केएसआर बेंगळुरू-बेळगावी' वंदे भारत आणि 'श्रीमाता वैष्णोदेवी कटरा-अमृतसर' वंदे भारत या तीन वंदे भारत गाड्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार,दि.१० ऑगस्ट रोजी हिरवा झेंडा दाखवतील. केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या नव्या गाड्या धावतील. सध्या देशात २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना व्यापणाऱ्या ७२ वंदे भारत ट्रेन धावत आहेत, ज्या १४४ सेवांद्वारे प
काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगावर टीका केली. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांच्या आरोपांना फेटाळून लावत म्हटले आहे की, गांधी यांनी पुन्हा एकदा जुनीच स्क्रिप्ट वाचली असून, २०१८ मध्येही अशाच स्वरूपाचे खोटे दावे तत्कालीन मध्यप्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी केले होते.
(Bombay High Court On Pigeon Feeding) गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादर कबुतरखाना हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मुंबई महापालिकेने नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन हा कबुतरखान्यावर कारवाई करत ताडपत्रीने झाकून बंद केला होता. या निर्णयानंतर जैन समाजाने आक्रमक पवित्रा घेत ही ताडपत्री हटवली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी ७ ऑगस्टला सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने आपला आधीचा निर्णय कायम ठेवत कबुतरखाना बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले
(Mangal Prabhat Lodha) दादरच्या कबूतरखान्याजवळ झालेल्या राडाप्रकरणात आता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाष्य केले आहे. बुधवारी ६ ऑगस्टच्या सकाळी कबूतरखान्याजवळ गोंधळ घालणारे, पोलिसांशी हुज्जत घालणारे आणि तोडफोड करणारे लोक बाहेरचे असल्याचे मंत्री लोढा यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
(PM Narendra Modi inaugurates Kartavya Bhavan) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ६ ऑगस्ट रोजी दिल्लीतील कर्तव्यपथावरील कर्तव्य भवनाचे उद्घाटन केले. दिल्लीतील विविध मंत्रालये आणि विभागांना एकाच ठिकाणी एकत्र आणण्यासाठी कर्तव्य भवन उभारण्यात आले आहे. कार्यक्षमता, नवोन्मेष आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे.
भारताच्या सांस्कृतिक वैभावाचे साक्षीदार म्हणजे इथली मंदिरं, या मंदिरांची निर्मीती कशी झाली, त्या मंदिरांची शैली कशी ओळखावी? महाराष्ट्रातील तसेच भारतातील वैशिष्ठ्यपूर्ण मंदिरांचा इतिहास काय या विषयावर भटकंती कट्टाच्या माध्यमातून विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
नव्याने उभ्या राहणाऱ्या झोपड्या ही सर्वच नियोजन प्राधिकरणांना डोकेदुखी ठरली असून बेकायदा झोपड्या रोखण्यासाठी प्रशासकीय प्रयत्न अपुरे ठरत आहेत. हेच पाहता, आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने एआयचा वापर नव्याने उभ्या राहणाऱ्या झोपड्या रोखण्यासाठी करण्याचे ठरविले आहे. यासाठी झोपूप्राधिकरणाने मालवणीत प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन नव्याने उभ्या राहिलेल्या झोपड्या हुडकून काढून त्यावर कारवाई करण्यासाठी संबंधित नियोजित प्राधिकरणांना माहिती पाठविली जाणार आहे.
लोअर परळ येथील कमला मील परिसरात अनधिकृत रीत्या सुरू असलेल्या ‘लिव्हिंग लिक्विडस्’ या उपाहारगृहावर मनपाने कठोर कारवाई करत परवाने रद्द केले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या आदेशानुसार ही कारवाई आज करण्यात आली.
विशेष प्रतिनिधी कर्तव्यपथावरील या नव्या कर्तव्य भवनांमधूनच आता नव्या भारताची विकासयात्रा लिहिली जाणार आहे. त्यामुळे या केवळ वास्तू नसून कोट्यवधी भारतीयांची स्वप्ने साकारण्याचती तपोभूमी आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केले आहे.
(Mahua Moitra vs Kalyan Banerjee) तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार महुआ मोइत्रा आणि कल्याण बॅनर्जी यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यांच्यातील हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. खासदार मोइत्रा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये खासदार बॅनर्जी यांचा ‘डुक्कर’ (Pig) असा उल्लेख केल्यामुळे बॅनर्जी मोइत्रा यांच्यावर संतापले आहेत. बॅनर्जी यांनी मोइत्रा यांचे शब्द अमानवीय असल्याचे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. व्हर्च्युअल बैठकीत कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा देण
केवळ एक यशस्वी खेळाडू नव्हे, तर नेतृत्वगुण आणि प्रशिक्षणातून आपली वेगळी ओळख निर्माण करणार्या क्रीडाविश्वातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मेघाली कोरगावकर-म्हसकर यांच्याविषयी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ ऑगस्ट रोजी दुपारी १२:१५ वाजता दिल्लीतील कर्तव्यपथ येथील कर्तव्य भवनाचे राष्ट्रार्पण करतील. त्यानंतर, पंतप्रधान सायंकाळी ६:३० वाजता कर्तव्यपथ येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करतील.
(Satyapal Malik former J&K governor passes away at 79) जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले, यासंदर्भात त्यांचे वैयक्तिक सचिव केएस राणा यांनी सोमवारी ५ ऑगस्ट रोजी माहिती दिली. मलिक गेल्या काही आठवड्यांपासून मूत्रपिंडाशी संबंधित आजारावर उपचार घेत होते.
बाल स्वयंसेवक म्हणून कार्याला सुरुवात करून अरुणाचल प्रदेशात सलग दहा वर्षे संघ प्रचारक म्हणून कार्य केलेले, आणि सध्या प्रज्ञा प्रवाहाचे पश्चिम क्षेत्र संयोजक असलेले लेखक सुनील कीटकरु यांना 'समरसता पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले.
कबुतरांचा आणि कबुतरखान्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. यांसंदर्भात पालकमंत्री मंगल प्रभात लोढ़ा यानी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र पाठवलंय. या पत्रात लोढा काय म्हणालेयत? या प्रश्नावर मनपा आयुक्तांचं काय म्हणणं आहे? उच्च न्यायालयाने काय म्हटलंय? कबुतरखाने बंद करण्याला विरोध का होतोय? स्थानिक लोकांचे काय म्हणणं आहे? यासंदर्भात पेटाची भूमिका काय आहे? डॉक्टरांचं म्हणणे काय आहे?
आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे बावनकुळेंचे आदेश; पालकमंत्री कार्यालयाकडून तक्रारही दाखल राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने पोलिसांना दमदाटी करणाऱ्या तीन इसमांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराची तातडीने गंभीर दखल घेत स्वतः पालकमंत्री बावनकुळे यांनी या आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
पर्यायी व्यवस्था होईपर्यंत नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवा ; आवश्यकतेनुसार सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडणार कबूतरखाना अचानक बंद करणे योग्य नसून पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत महानगरपालिकेने कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा सुरू ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी दिले. कबुतरखान्याच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.
महाराष्ट्रात आता ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सदर चित्रपटात ‘शिवरायांच्या सैन्यात ३५ टक्के मुस्लीम होते, शिवरायांनी रायगडावर मशीद बांधली होती, शिवरायांचे ११ अंगरक्षक मुस्लीम होते,’ असे ‘खोटे नॅरेटिव्ह’ प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीसुद्धा गेल्या दोन-तीन दशकांपासून अनेक विचारवंत आणि सेयुलर पोंगापंडितांनी असाच बिनबुडाचा इतिहास प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. परंतु, या तथाकथित विचारवंतांनी तेव्हा आणि आजही याबाबतचा कोणताही समकालीन पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे शिव
समरसता साहित्य परिषदेचे २०वे साहित्य संमेलन दि. २ आणि दि. ३ ऑगस्ट रोजी नांदेड येथे संपन्न झाले. या ‘नवोद्दतरी साहित्य आणि समरसता’ विषयावर संमेलन आधारित होते. संमेलनाचे अध्यक्ष होते ‘पद्मश्री’ नामदेव कांबळे, तर स्वागताअध्यक्ष होते खा. डॉ. अजित गोपछडे. संमेलनाला नांदेड गुरूद्वाराचे बाबा सतनाम सिंग यांचा आशीर्वाद लाभला, तर काही विघातक लोकांच्या धमक्यांमुळे महाथेरो राहुल बोधी हे संमेलनाला उपस्थित राहू शकले नाही, अशी चर्चा होती. तरीही, सर्वार्थाने चर्चेत राहिलेल्या या सर्वांगसुंदर संमेलनाचा मागोवा या लेखात घेतला
(Krasheninnikov Volcano erupts after 600 years in Russia) रशियामध्ये तब्बल ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच क्रॅशेनिनिकोव्ह (Krasheninnikov) ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. कामचात्का बेटांवर स्थित हा ज्वालामुखी आहे. रशियाची सरकारी वृत्तसंस्था आरआयएने आणि वैज्ञानिकांनी याविषयी माहिती रविवारी ३ ऑगस्टला दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ज्वालामुखीचा उद्रेख झाल्यानंतर यातून बाहेर पडणाऱ्या राखेचे लोट हे ६,००० मीटर उंचीपर्यंत पोहोचले होते. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
राष्ट्र सेविका समिती’च्या केंद्रीय कार्यालय प्रमुख, अखिल भारतीय कार्यकारी, जागतिक विभाग प्रमुख, सह-कार्यवाहिका (२००३ ते २००६) आणि प्रमुख संचालिका (२००६ ते २०१२) अशा विविध जबाबदार्या प्रमिलताईंनी यशस्वीरित्या सांभाळल्या. त्यांनी देशभरात आणि परदेशातही प्रवास केला, ज्यात श्रीलंका, केनिया, युनायटेड किंग्डम, अमेरिका इत्यादी देशांचा समावेश आहे. अमेरिकेतील प्रवासादरम्यान त्यांना न्यू जर्सीचे मानद नागरिकत्वही मिळाले होते. २०२० साली ‘एसएनडीटी’ विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
लेह-लडाख हा देशाच्या सामरिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रदेश. या प्रदेशाची सुंदरता नेत्रदीपक अशीच! मात्र, दीर्घकाळ या भागामध्ये पायाभूत सुविधांचा विकास न झाल्याने, सैन्य आणि आर्थिक समृद्धी या दोहोंच्या गतीवर मर्यादा येत होत्या. मात्र, मोदी सरकारच्या काळात यावर विशेष काम करत रस्ते बांधणीला महत्त्व दिल्याने आता सैन्याच्या हालचाली आणि पर्यटनातून येणारी समृद्धी या दोघांनीही वेग पकडला आहे. मोदी सरकारने लडाखमध्ये केलेल्या सुधारणांचा घेतलेला आढावा...
" पद्मश्री नामदेव कांबळे यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून समाजातील वास्तवावर भाष्य केलं. त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून समतेचे आणि समरसतेच स्वप्न आकार घेतं " असे प्रतिपादन २० व्या समरसता साहित्य संमेलनातील युवकांनी केले. " पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या साहित्यकृती - विद्यार्थ्यांच्या नजरेतून " या परिसंवादात ते बोलत होते.
समरसता साहित्य संमेलनात विचारवंतांची उपस्थिती; समाजप्रबोधनावर भर "समरसता हा सामाजिक जीवनात जगण्याचा महत्वाचा विषय असून साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. परिवर्तनासाठी प्रवर्तन आवश्यक आहे,म्हणूनच समाजनिष्ठ साहित्यनिर्मिती ही काळाची गरज आहे. त्यामुळे भारत अधिक सुदृढ व शक्तिशाली राष्ट्र होऊ शकतो," असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त व पद्मश्री नामदेवराव कांबळे यांनी केले. ते श्रीगुरूगोविंदसिंह साहित्यनगरी नांदेड येथील २० व्या समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बोलत होते.
कबुतरांना खायला घातल्याप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार दि. २ ऑगस्ट रोजी माहिमच्या एल.जे. रोडवर न्यायालयाच्या मनाई नंतरही कबुतरांना खाद्य दिल्याचा प्रकार घडला आहे. त्यासंबंधित एका अनोळखी इसमाविरोधात माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे.
संस्कार भारतीचे पूर्वाध्यक्ष, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्तजी यांना पद्मभूषण (२०२४) व ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांना पद्मश्री (२०२५) मिळाल्याबद्दल संस्कार भारती कोकण प्रांताच्या वतीने 'अभ्यासोनी प्रकटावे' हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम रविवार, दि. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे संपन्न होत आहे. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत खाजगी क्षेत्रातील संस्था, तज्ञ व्यक्ती इ. समवेत चर्चा घडवून योग्य नियोजनाव्दारे दिर्घकाळ टिकणा-या सुविधा, महापालिका प्रशासनावर कोणताही आर्थिक भार न येता निर्माण करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सीएसआर कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेमार्फत भविष्यात राबविल्या जाणा-या समाज उपयोगी उपक्रमांना चालना मिळणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सूत्रधार? न्यायालयाच्या निरीक्षणात काय?
शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट कल्याण-डोंबिवलीहून थेट ठाण्याला जोडणाऱ्या रेल्वे समांतर रस्त्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
जालना येथील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी गुरुवार, ३१ जुलै रोजी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय युवा दिग्दर्शक रमेश होलबोले यांना प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय आणि मराठीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या शुभहस्ते, ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज’ (डिक्की)चे संस्थापक ‘पद्मश्री’ डॉ. मिलिंद कांबळे व ‘अखिल भारतीय होलार समाज संघटने’चे संस्थापक व समाज नेते अॅड. एकनाथ जावीर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि तितकेच वादग्रस्तही ठरले. या खटल्यात हिंदुत्ववादी व्यक्ती आणि संघटनांना नाहक गोवून बेछूट आरोप, असहनीय शारीरिक-मानसिक अत्याचार तर झालेच; पण तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसची मजल ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग रुढ करण्यापर्यंत गेली. पण, तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर काल या खटल्याचा लागलेला निकाल म्हणजे, ‘भगवा दहशतवादा’चे कुभांड रचणार्यांना लगावलेली जोरदार चपराकच! त्यामुळे हिंदू धर्माविषयी कितीही असत्य पेरले, पसरवले, तरी शेवटी विजय सत्याचा, न्यायाचा
‘मुंबई ते मुंबई या’ माझ्या पुस्तकाचा आगळावेगळा पुस्तक प्रकाशन सोहळा दि. १९ जुलै रोजी डॉ. भानूबेन नानावटी कलाघर, गोरेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम म्हणजे पुस्तकाचा प्रकाशन सोहळा जरी असला, तरी त्यातून समाजमन प्रतित झाले. त्याचा मागोवा या लेखात घेतला आहे.
(Two Terrorists Killed In Operation Shivshakti) जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीचा एक मोठा प्रयत्न भारतीय सैन्याने उधळून लावला. सीमेपलीकडून भारतात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा बुधवारी ३० जुलैला पहाटे केलेल्या कारवाईत खात्मा करण्यात आला आहे.
बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचे निरीक्षण बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे कराडचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे.
बीड न्यायालयात आका म्हणजेच वाल्मिक कराडसाठी एक स्पेशल फोन सापडला आहे, असा दावा भाजप नेते सुरेश धस यांनी केला आहे. तसेच त्यांनी या फोनचे डिटेल्स घेण्याचीही मागणी केली आहे. बुधवार, ३० जुलै रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विरार-अलिबाग कॉरिडॉरसाठी भिवंडी तालुक्यातील १४ गावांमधील शेतकऱ्यांची जमीन जाणार असून, या जमिनीला योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. `एमएसआरडीसी'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांची मंगळवारी भेट घेतल्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांना नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रस्तावाला राज्य सरकारची मान्यता मिळेल, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 'द रेसिस्टन्स फ्रंट' (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेचा थेट सहभाग असल्याचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (युएनएससी) निर्बंध समितीच्या निरीक्षण पथकाने (मॉनिटरिंग टिम) आपल्या अहवालात स्पष्टपणे नोंदवले आहे. हा अहवाल भारतासाठी एक महत्त्वाचा राजनैतिक विजय मानला जात आहे.
भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन शिवशक्ती’मध्ये भारतीय लष्कराने जम्मू – काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
‘पाकव्याप्त काश्मीर’ (पीओके) ही काँग्रेसची ऐतिहासिक चूक आहे. ही चूक आम्हीच सुधारणार असून भाजपचे सरकारच पीओके परत आणणार, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी राज्यसभेत दिली.
या श्लोकापासून पंचदशी मंत्रातील दुसरा विभाग, मध्यकूट अर्थात ‘कामराज कूट’ सुरू होत आहे. या कुटातील बीजाक्षरे ह, स, क, ह, ल, ह्रीं अशी आहेत. हे कूट इच्छाशक्तीचे प्रकटीकरण आहे. या श्लोकात श्री ललिता देवीची चाल आणि हंसांचे डौलदार चालण्याची तुलना केली आहे. श्री ललिता सहस्त्रनामात याच अर्थाचेही एक नाम आहे.
पहलगाम हल्ला करणारे दहशतवादी ठार, केंद्रीय गृहमंत्र्यांची लोकसभेत माहिती , पाकिस्तानला क्लीनचिट देणाऱ्यांनी प्रश्न विचारू नये , काँग्रेसला टोला सुरक्षा दलांनी राबविलेल्या ‘ऑपरेशन महादेव’मध्ये पहलगाम हल्ला करणारे सुलेमान, अफगान आणि जिब्रान हे तिन्ही दहशतवाद्यांना ठोकण्यात आले आहे, असे प्रतिपादन देशाचे गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी मंगळवारी लोकसभेत केला आहे.
उबाठा गटाचे नेते अनिल परब यांनी यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर डान्स बार आणि वाळू चोरी प्रकरणी गंभीर आरोप केले होते. याच अनुषंगाने मंगळवार, २९ जुलै रोजी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर योगेश कदम यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
मुंबई विद्यापीठाच्या महिला वसतीवस्तीगृहामध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी विधानपरिषद व विधानसभेत उपस्थित झाल्या होत्या. उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी यावर कारवाईचे आश्वासन सभागृहात दिले होते. यानंतर तत्काळ शासन निर्णय जारी केला आहे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुंबई विद्यापीठाच्या महिला वसतिगृहांमधील मूलभूत सुविधांची परिस्थिती तपासण्यासाठी नऊ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे की विधान सभा आणि परिषदेचे आमदारांचा समावेश असलेल्या समितीने दोन महि
कल्याण पूर्वेतील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने त्याविरोधात भाजपाने मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसत मोर्चा काढला. भाजपाने महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रभाग कार्यालयासमोरील कल्याण पूना लिंक रोडवर ठिय्या मांडून तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर महापालिकेने पाणी टंचाई सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपाने रास्ता रोको आंदोलन मा
विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांना केंद्र सरकारकडून हाती घेण्यात आलेल्या ‘जनऔषधी योजने’चा सर्वाधिक लाभ होत असल्याचे आढळून आले आहे. याचाच अर्थ या राज्यांच्या बाबतीत केंद्रातील मोदी सरकार कोणताही दुजाभाव करीत नसल्याचे दिसून येत आहे. राजकीय सीमांचा विचार न करता, त्यापलीकडे जाऊन मोदी सरकार ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हे लक्षात ठेऊन कार्य करीत असल्याचे यावरून दिसून येते.