कोलकाता : (Mahua Moitra vs Kalyan Banerjee) तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार महुआ मोइत्रा आणि कल्याण बॅनर्जी यांच्यातील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. त्यांच्यातील हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. खासदार मोइत्रा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये खासदार बॅनर्जी यांचा ‘डुक्कर’ (Pig) असा उल्लेख केल्यामुळे बॅनर्जी मोइत्रा यांच्यावर संतापले आहेत. बॅनर्जी यांनी मोइत्रा यांचे शब्द अमानवीय असल्याचे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. व्हर्च्युअल बैठकीत कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा देण्याची घोषणाही केली.
कल्याण बॅनर्जी यांची पोस्ट
मोइत्रा यांना प्रत्युत्तर देताना कल्याण बॅनर्जी यांनी एक्स वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये बॅनर्जी म्हणालेत की, "मी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये महुआ मोइत्रा यांनी माझ्याबद्दल केलेल्या काही प्रतिक्रिया ऐकल्या. माझ्याबद्दल बोलताना त्यांनी ज्या शब्दांची निवड केलीय ती निवड आक्षेपार्ह आहे. त्यांनी आपल्या सहकारी खासदाराची डुकराशी तुलना करण्यासारखी अमानवीय भाषा वापरली आहे. हे खूप दुर्दैवी आहे. केवळ दुर्दैवी नाही तर त्यांनी सुसंस्कृत संवादाच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष केलं आहे.
I have taken note of the recent personal remarks made by Ms. Mahua Moitra in a public podcast. Her choice of words, including the use of dehumanising language such as comparing a fellow MP to a "pig", is not only unfortunate but reflects a deep disregard for basic norms of civil…
कृष्णानगरच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी रविवारी एका वृत्तसंस्थोशी पॉडकास्टच्या माध्यमातून बातचीत केली. महुआ मोइत्रा यांनी अलीकडेच पिनाकी मिश्रा यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाबद्दल कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या टिप्पणीवर मोइत्रा यांनी पॉडकास्टमध्ये बोलताना खेद व्यक्त केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, "तुम्ही डुकराबरोबर कुस्ती करू शकत नाहीत. तुम्ही चिखलात लोळावं अशी डुकराची इच्छा असते. तुम्ही डुकरासारखे घाणीत लोळलात तर ते आनंदी होत. भारतात महिलांचा तीव्र द्वेष करणारे, लैंगिकदृष्ट्या निराश, भ्रष्ट पुरूष खूप आहेत. वेगवेगळ्या पक्षांकडून ते संसदेत प्रतिनिधीत्व करत आहेत."
बॅनर्जी काय म्हणाले?
महुआ मोइत्रा यांच्या विधानावर बॅनर्जी संतापले. मोइत्रा यांनी केलेल्या वक्तव्यावर कल्याण बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खासदार बॅनर्जी म्हणाले, "जे लोक प्रत्युत्तर म्हणून अपशब्द वापरतात, त्यांनी एकदा तरी विचारमंथन करावं की ते नेमकं कुठल्या प्रकारचं राजकारण करत आहेत. या अशा वक्तव्यामुळे त्यांचा पोकळपणा उघड होतो. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी शिवीगाळ करू लागते, आक्षेपार्ह शब्दांचा वापर करून प्रत्युत्तर देऊ लागतो, अश्लील व्यंगाच्या माध्यमातून उत्तर देऊ लागतो तेव्हा ती त्याची ताकद नसते तर त्याच्या असुरक्षिततेची भावना त्याला असं करायला भाग पाडते."
ममतांच्या सूचना
ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या खासदारांना स्पष्ट शब्दात सांगितले की, भविष्यात असा संघर्ष होऊ नये. त्यांनी सर्वांना केंद्र सरकारच्या एसआयआर आणि एनआरसी सारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले. पक्षाची विश्वासार्हता सर्वोपरि आहे आणि वैयक्तिक संघर्ष संघटना कमकुवत करतात हे देखील ममतांनी स्पष्ट केले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\