मुंबई विद्यापीठाच्या महिला वसतीगृहांबदद्ल सादर होणार शासनाचा अभ्यास अहवाल

    29-Jul-2025   
Total Views |

मुंबई
: मुंबई विद्यापीठाच्या महिला वसतीगृहामध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारी विधानपरिषद व विधानसभेत उपस्थित झाल्या होत्या. उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी यावर कारवाईचे आश्वासन सभागृहात दिले होते. यानंतर तत्काळ शासन निर्णय जारी केला आहे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुंबई विद्यापीठाच्या महिला वसतिगृहांमधील मूलभूत सुविधांची परिस्थिती तपासण्यासाठी नऊ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे की विधान सभा आणि परिषदेचे आमदारांचा समावेश असलेल्या समितीने दोन महिन्यांच्या आत अभ्यास अहवाल सादर करावा. मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील न्यू गर्ल्स होस्टेल आणि नरीमन पॉइंट येथील मादाम कामा महिला वसतीगृह या वसतीगृहांतील सुविधा आणि समस्या यांचा आढावा ही समिती घेणार आहे.

या समितीचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर आहेत. तसेच समितीत आ. अनिल परब, आ. निरंजन डावखरे, आ. मनिषा कायंदे, आ. मिलिंद नार्वेकर, आ. सुनील प्रभू, आ. मंगेश कुडाळकर आणि आ. शेखर निकम यांचा समावेश आहे. विभागीय सहसंचालक हे समितीचे सदस्य-सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.