मुंबई : संस्कार भारतीचे पूर्वाध्यक्ष, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्तजी यांना पद्मभूषण (२०२४) व ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांना पद्मश्री (२०२५) मिळाल्याबद्दल संस्कार भारती कोकण प्रांताच्या वतीने 'अभ्यासोनी प्रकटावे' हा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम रविवार, दि. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे संपन्न होत आहे. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील.
राजदत्तजी आणि वासुदेव कामत हे दोघेही संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष राहिले आहेत. या कार्यक्रमात दोन्ही सन्मानित पाहुण्यांच्या अनुभवांवर, कार्यावर आणि विचारांवर आधारित एक विशेष संवाद होईल, ज्यामध्ये प्रेक्षकांना त्यांच्या कलात्मक प्रवासाची प्रेरणादायी झलक ऐकायला मिळेल. चतुरंग प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर यांच्याशी संवाद साधतील. अधिक माहितीसाठी संपर्क संकेत शिंगोटे (8691068976)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक