पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या कर्तव्य भवनाची 'ही' आहेत वैशिष्ट्ये; जाणून घ्या सविस्तर...

    06-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली : (PM Narendra Modi inaugurates Kartavya Bhavan) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ६ ऑगस्ट रोजी दिल्लीतील कर्तव्यपथावरील कर्तव्य भवनाचे उद्घाटन केले. दिल्लीतील विविध मंत्रालये आणि विभागांना एकाच ठिकाणी एकत्र आणण्यासाठी कर्तव्य भवन उभारण्यात आले आहे. कार्यक्षमता, नवोन्मेष आणि सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे.

या कर्तव्य भवनात गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय/विभाग आणि प्रमुख वैज्ञानिक सल्लागार (पीएसए) यांची कार्यालये असतील.कर्तव्य भवन-३ हे एक अत्याधुनिक कार्यालय संकुल आहे. संकुलाचे बांधकाम क्षेत्रफळ १.५ लाख चौरस मीटर क्षेत्रात पसरलेले आहे. त्याच्या तळमजल्याचे क्षेत्रफळ ४० हजार चौरस मीटर आहे. सात मजली इमारतीमध्ये बालगृह, योगा कक्ष, वैद्यकीय कक्ष, कॅफे, स्वयंपाकघर आणि बहुउद्देशीय हॉल आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?

  • या इमारतीत २ तळघरे आणि ७ मजले (तळमजला + ६ मजले)
  • एकूण ८५० कार्यालयीन खोल्या आहेत.
  • पार्किंग सुविधांमध्ये ६०० वाहनांची क्षमता

मजल्यानुसार मंत्रालय:

  • पहिला मजला: पेट्रोलियम मंत्रालय
  • दुसरा मजला: एमएसएमई आणि डीओपीटी मंत्रालय
  • तिसरा मजला: परराष्ट्र मंत्रालय
  • चौथा, पाचवा आणि सहावा मजला: गृह मंत्रालय
  • पाचवा मजला: गृहमंत्र्यांचे कार्यालय
  • सहावा मजला: इंटेलिजेंस ब्युरो


सर्व गेट्सवर आधुनिक सुरक्षा उपकरणे बसवण्यात आली आहेत, ज्यात हे समाविष्ट आहे:

  • फ्लॅप बॅरियर्स
  • मेटल डिटेक्टर
  • सामान तपासणीसाठी एक्स-रे स्कॅनर
  • वाहनांच्या अंडरकॅरेजसाठी स्कॅनिंग सिस्टम
  • बूम बॅरियर्स आणि वाहन ब्लॉकर्स
  • इमारतीभोवती वीजेचे कुंपण असलेली भिंत.
  • एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर 

पर्यावरणाप्रती वचनबद्धता

  • सौर पॅनेल आणि सौर वॉटर हीटर.
  • पावसाचे पाणी साठवण आणि पुनर्वापर प्रणाली.
  • सांडपाणी प्रक्रिया प्रणाली.
  • इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन






अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\