मुंबई : प्रयागराजच्या करेली परिसरात मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या पुढाकाराने मुस्लिम समाजातील बंधू-भगिनींना मोठ्या उत्साहात रक्षाबंधन उत्सव साजरा केला. या प्रसंगी उपस्थितांनी परस्परांमधील बंधुता आणि प्रेम वृद्धिंगत करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमात मुस्लिम समाजातील महिलांनी रक्षासूत्र बांधून पारंपरिक नात्याच्या मजबुतीचे प्रतीक सादर केले व एकमेकांच्या सुरक्षेचे आणि सन्मानाचे वचन दिले. यावेळी आयोजक म्हणाले, रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही, तर देशाच्या अखंडतेचा आणि परस्पर विश्वासाचा प्रतीक आहे.
वक्त्यांनी असा संदेश दिला की आपण धार्मिक, भाषिक आणि सांस्कृतिक भेदभावापलीकडे जाऊन विचार करावा. आपण एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे. या प्रसंगी इमरान अहमद, वाकिम अहमद, रुखसाना बेगम, आसिया बेगम आणि बबिता जयस्वाल यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. सर्वांनी देशाची एकता, अखंडता आणि बंधुता टिकवून ठेवण्याचा संकल्प केला.