समाजवास्तवाचे भाष्यकार म्हणजे नामदेव कांबळे! समरसता साहित्य संमेलनात युवकांचे मनोगत

    03-Aug-2025   
Total Views |

नांदेड : " पद्मश्री नामदेव कांबळे यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून समाजातील वास्तवावर भाष्य केलं. त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून समतेचे आणि समरसतेच स्वप्न आकार घेतं " असे प्रतिपादन २० व्या समरसता साहित्य संमेलनातील युवकांनी केले. " पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या साहित्यकृती - विद्यार्थ्यांच्या नजरेतून " या परिसंवादात ते बोलत होते.

दि. ३ ऑगस्ट रोजी, २० व्या समरसता साहित्य संमलेनाच्या दुसऱ्या दिवशी पद्मश्री नामदेव कांबळे यांच्या साहित्यावर आधारित एका विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सदर परिसंवादाचे अध्यक्षस्थान प्राध्यापिका लता मोरे यांनी भूषवले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नामदेव कांबळे यांच्या साहित्य वर भाष्य केले. पुण्यातील युवक पार्थ भेंडेकर यांनी " नामदेव कांबळे यांचे ललितगद्य " या विषयावर भाष्य केले. आपले मत मांडताना ते म्हणाले की नामदेव कांबळे यांच्या लिखाणामध्ये आपल्याला असे विविधता तर सापडतेच परंतु त्याच बरोबर स्वत्वाचा शोध सुद्धा आपल्याला येथे बघायला मिळतो. नचिकेत मेकाले यांनी नामदेव कांबळे यांचे कथाविश्व या विषयावर भाष्य केले. नामदेव कांबळे यांच्या साहित्यामध्ये आपल्या समाजाचा ज्वलंत चित्र दिसतं असे मत व्यक्त केले. युवतीa आस्था सोनटक्के यांनी नामदेव कांबळे यांच्या कवितेतील मर्मस्थळांवर प्रकाश टाकला. गंगाधर कुलकर्णी, नामदेव कांबळे यांच्या राघव वेळ या कादंबरीवर विचार प्रकट करताना म्हणाले की या कादंबरीमध्ये समाज संघर्षाची मांडणी जरी असली तरी सुद्धा यातील स्त्री कणखर आहे व जिद्दीने पुढे जाणारी आहे, म्हणूनच त्यांचं हे साहित्य समाजाला दिशा देणारे आहे.


मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.