Free Ration

स्वरसामर्थ्याचे प्रतीक म्हणजे पद्मजा!: भावगंधर्व पंडित ह्रदयनाथ मंगेशकर -  मान्यवरांच्या उपस्थितीत ' स्वर चंद्रिका - एक सांगितिक प्रवास ' या गौरवग्रंथाचे प्रकाशन

"पद्मजाचा सांगितीक प्रवास सांगणारा ग्रंथ आज इथे प्रकाशित होतो आहे, याचा मला आनंद आहे. शास्त्रीय संगीत, भावसंगीताच्या माध्यमातून तिने आपली साधना निरंतर सुरु ठेवली. खरं सांगायचं तर पद्मजाचं गाणं म्हणजे स्वरसाम्यर्थ्याचं प्रतीक आहे" असे प्रतिपादन पद्मश्री पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी केले. 'स्वरचंद्रीका : एक सांगितिक प्रवास' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की " रुढार्थाने सिनेगीतांच्या वाटेवर न चालता पद्मजाने भावगीतांच्या माध्यमातून स्वताची वेगळी ओळख

Read More

अहिंसेच्या वाटेवर तलवारीचा ठसका : ‘संगीत संन्यस्त खड्ग’

मराठी रंगभूमीवर परंपरेची पाठराखण करणारी अनेक नाटके आली. काही काळाच्या वाळवंटात रुतून गेली, तर काही आजही काळाच्या गर्जनेला उत्तर देताना नव्या अर्थाने समोर येतात. ’संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक त्याच परंपरेतील एक तेजस्वी तलवार, जी केवळ शस्त्र नाही, तर विचारांची लखलखीत धारही आहे. या नाटकाची रचना स्वयं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १९३१ रोजी केली होती. राजकीय क्रांतिकारकाच्या लेखणीतून उतरलेलं हे नाटक, केवळ नाट्यशास्त्रीय नव्हे, तर तत्त्वज्ञानाचंही एक मोठं दालन उघडतं. गौतम बुद्धाच्या काळातील शाय वंश,

Read More

परिपूर्णतेचा साक्षात्कार म्हणजे माणिक वर्मा!

" माणिक वर्मा यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असंख्य पैलू दडले होते, वास्तविक माणिक वर्मा म्हणजे परिपूर्णतेचा साक्षात्कार होता" असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. दिवंगत गायिका माणिक वर्मा यांच्या सांगीतिक जीवनाचा आढावा घेणाऱ्या " माणिक मोती" या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, लेखक अच्युत गोडबोले, राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, जेष्ठ शास्त्रीय संगीतकार विकास कशाळकर, चैतन्य कुंटे, माणिक वर्मा यांच्या शिष्य

Read More

भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” या गाण्याने केला १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार!

भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” या गाण्याने केला १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार!

Read More

व्हिएतनामी संगीत चित्रपट पहिल्यांदाच होणार हिंदीत प्रदर्शित

पणजी : पणजी येथे नुकताच ५५वा ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ पार पडला. जगभरातील विविध भाषेतील चित्रपटांनी आपले प्रदर्शन जागतिक स्तरावर करत आपली अनोखी ओळख निर्माण केली आहे. दरम्यान, यावर्षी इफ्फीमध्ये ‘फ्रजाईल फ्लॉवर’ हा व्हिएतनामी भाषेतील चित्रपट ( Musical Film ) सादर झाला असून, हा चित्रपट पहिल्यांदाच भारतात हिंदी भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शिका मायथ्यू विएन यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी विशेष संवाद साधत भारतात व्हिएतनामी चित्रपट का प्रदर्शित करावासा वाटला याबद्दल माहिती दिली.

Read More

‘वन डायरेक्शन’ बॅंडमधील ३१ वर्षीय गायकाचा हॉटेलच्या बाल्कनीमधून कोसळून दुर्दैवी मृत्यू

जगभरातील संगीतप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी आहे. लोकप्रिय 'वन डायरेक्शन' या बँडचा गायक लियाम पायने याचा हॉटेलमध्ये मृत्यु झाला. अर्जेंटीना देशातील ब्यूनस आयर्स शहरात लियाम पायने येथे गायकाचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमधून कोसळत लियामचा मृत्यू झाला. वयाच्या ३१ व्या वर्षीं त्याचा मृत्यू झाला असून लियामच्या अकस्मान निधनाने जगभरातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेचा सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Read More

'स्वरगंधर्व सुधीर फडके' चरित्रपट महाराष्ट्रदिनी प्रदर्शित होणार

ज्यांच्या अवीट सुरांनी साऱ्यांनाच वेड लावले, ज्यांच्या 'गीतरामायणा'ने प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात स्थान निर्माण केले, त्या बाबुजींचा अर्थात गीतकार, संगीतकार सुधीर फडके (Sudhir Phadke) यांचा आयुष्यपट लवकरच रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येत आहे. नुकताच 'स्वरगंधर्व सुधीर फडके' (Sudhir Phadke) या चित्रपटाचा दुसरा टिझर प्रदर्शित झाला असून एका प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी गायकाचे जीवन या चित्रपटातून उलगडणार आहे. टीझरमध्ये 'माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासात पदोपदी सोसलेल्या जाणिवेतून, ही आर्तता माझ्या स्वरात उतरते

Read More

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जीवनावर आधारित भित्तिशिल्पाचे उद्या अनावरण!

स्वरसम्राज्ञी, भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांना अभिवादन म्हणून संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमीट योगदानावर आधारित भित्तिशिल्प मुंबई महानगरपालिकेच्या डी विभागाने न्यायमूर्ती सीताराम पाटकर मार्गावर केम्प्स उड्डाणपुलालगत साकारले आहे. या भित्तिशिल्पाचे अनावरण दि. १० मार्च २०२४ रोजी सायंकाळी राज्‍याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते, तसेच मंगेशकर कुटुंबिय व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

Read More

प्यारेलाल रामप्रसाद शर्मा, जावेद अख्तर आणि कविता कृष्णमूर्ती करणार भारताचा सांगीतिक वारसा समृद्ध

सोनी एन्टरटेन्मेंट वाहिनी आपल्या देशातील असामान्य बाल प्रतिभेला प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या सुपरस्टार सिंगर या लहान मुलांच्या गायन रियालिटी शोची तिसरी आवृत्ती ‘सुपरस्टार सिंगर सीझन ३’ घेऊन येत आहे. संगीत क्षेत्रातील नव्या दमाच्या गायकांना हक्काचा मंच देऊ करणाऱ्या या शो मधून हिंदी चित्रपटसृष्टीतल संगीत समृद्ध करणारे तीन ज्येष्ठ गायक, संगीतकार आणि गीतकार अर्थात प्यारेलाल रामप्रसाद शर्मा, जावेद अख्तर आणि कविता कृष्णमूर्ती भारतीय संगीताचा वारसा देखील समृद्ध करत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121