मुंबई : सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांचे वडिल वरिष्ठ कर सल्लागार आणि मुंबई उच्च न्यायालयातील नियुक्त वरिष्ठ वकील ॲड. श्रीकृष्ण नरहर इनामदार यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीकृष्ण यांच्या पश्चात पत्नी ललकारी, दोन मुले, सून आणि नातू असा परिवार आहे.
श्रीकृष्ण इनामदार यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी पुणे विद्यापीठातून बीएमसीसीमधून वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतले होते आणि त्यात ते प्रथम आले होते. तसेच शासकीय विधी महाविद्यालयातून एलएलबीमध्येही त्यांनी प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाचेगी ते मानकरी ठरले होते.
वकिली व्यवसायाची स्वतंत्र प्रॅक्टिस त्यांनी १९८४ मध्ये सुरू केली. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, किर्लोस्कर फेरस लिमिटेड, किर्लोस्कर लीजिंग अँड फायनान्स लिमिटेड, फोर्स मोटर्स लिमिटेड, सुदर्शन केमिकल लिमिटेड, सुंदरम फायनान्स लिमिटेड, बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेड यांसारख्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर देखील कार्यरत होते.