प्यारेलाल रामप्रसाद शर्मा, जावेद अख्तर आणि कविता कृष्णमूर्ती करणार भारताचा सांगीतिक वारसा समृद्ध

    19-Feb-2024
Total Views |

music show 
 
मुंबई : सोनी एन्टरटेन्मेंट वाहिनी आपल्या देशातील असामान्य बाल प्रतिभेला प्रेक्षकांसमोर आणणाऱ्या सुपरस्टार सिंगर या लहान मुलांच्या गायन रियालिटी शोची तिसरी आवृत्ती ‘सुपरस्टार सिंगर सीझन ३’ घेऊन येत आहे. संगीत क्षेत्रातील नव्या दमाच्या गायकांना हक्काचा मंच देऊ करणाऱ्या या शो मधून हिंदी चित्रपटसृष्टीतल संगीत समृद्ध करणारे तीन ज्येष्ठ गायक, संगीतकार आणि गीतकार अर्थात प्यारेलाल रामप्रसाद शर्मा, जावेद अख्तर आणि कविता कृष्णमूर्ती भारतीय संगीताचा वारसा देखील समृद्ध करत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
 
विविध संगीत प्रकारांत गायन करणाऱ्या बाल गायकांना सुपरस्टार सिंगर सीझन ३ मध्ये पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सलमान अली, मोहम्मद दानिश आणि सायली कांबळे हे पाच प्रसिद्ध गायक कॅप्टन म्हणून लाभणार आहेत. याबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना कविता कृष्णमूर्ती म्हणाल्या, “या बाल गायकांकडून आपल्या अपेक्षा व्यक्त करताना म्हटले, “गायन म्हणजे भावना अभिव्यक्त करणे, सुर स्पष्ट आणि अचूक लावणे. मला आशा आहे की, ही मुले प्रत्येक सुर सजीव आणि भावपूर्ण पद्धतीने लावायला शिकतील. आजची मुले टेक्नॉलॉजीने घेरलेली आहेत. त्यांना सर्व प्रकारचे संगीत आणि संगीताच्या तंत्राचे ज्ञान सहज प्राप्य आहे. पण, यशासाठी इतकेच पुरेसे नाही. त्यासाठी निष्ठा आणि सराव यांची आवश्यकता असते. गायनात मोठे यश मिळवण्यासाठी आपल्या गुरूंचे आणि संगीत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवणे आणि सुजाणपणे रियाज करणे या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. तंत्रावर प्रभुत्व मिळवून आणि भावनांची अभव्यक्ती साधून आपले गायन जिवंत करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे.”