‘वन डायरेक्शन’ बॅंडमधील ३१ वर्षीय गायकाचा हॉटेलच्या बाल्कनीमधून कोसळून दुर्दैवी मृत्यू

    17-Oct-2024
Total Views | 51
 
one direction
 
 
 
मुंबई : जगभरातील संगीतप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी आहे. लोकप्रिय 'वन डायरेक्शन' या बँडचा गायक लियाम पायने याचा हॉटेलमध्ये मृत्यु झाला. अर्जेंटीना देशातील ब्यूनस आयर्स शहरात लियाम पायने येथे गायकाचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनीमधून कोसळत लियामचा मृत्यू झाला. वयाच्या ३१ व्या वर्षीं त्याचा मृत्यू झाला असून लियामच्या अकस्मान निधनाने जगभरातील संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेचा सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
 
TMZ पब्लिकेशनने दिलेल्या माहितीनुसार लियाम पायने ज्या हॉटेलमध्ये राहात होता तिथे तो काहीतरी संशयीत व्यवहार करत असल्याचा दावा करण्यात आला. संध्याकाळी ५ वाजता लियामला हॉटेलच्या लॉबीमध्ये विचित्र गोष्टी करताना पाहिलं गेलं होतं. लियामने सुरुवातीला आपला लॅपटॉप घेऊन त्या लॅपटॉपला त्याच्याच खोलीत आग लावली होती.
 
 
 
तसेच, मृत्यु होण्याच्या एक तासाआधी लियाम त्याच्या मोबाईलवरुन स्नॅपचॅटवर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत होता. पोलिसांनी तपास केल्यावर लियामच्या रुममध्ये खूप सामान मोडकळलेल्या अवस्थेत सापडलं. दरम्यान, लियाम 'वन डायरेक्शन' या जगप्रसिद्ध बँडचा माजी गायक असून त्याची अनेक गाणी चाहत्यांमध्ये लोकप्रिय असून त्याच्या गाण्यांनी सर्वांना वेड लावलं आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121