सलील कुलकर्णींनी अमेरिकन क्रिकेटपटूसोबत गायलं ‘हे’ लोकप्रिय गाणं

    30-Jul-2024
Total Views |

Salil Kulkarni 
 
 
मुंबई : मराठी मनोरंजनविश्वातील संगीतकार, गीतकार, गायक, राष्ट्रीय पुरस्कार विजेते सलील कुलकर्णी अलीकडे सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. इतकंच नव्हे तर चालू घडामोडींवर परखड मतं देखील मांडताना दिसतात. नुकताच त्यांनी मराठमोळा अमेरिकन क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर सोबत गाणं गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
 
यापुर्वी सौरभने सलील यांच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘एकदा काय झालं’ या चित्रपटातील ‘रे क्षणा थांब ना’ हे गाणं गायलं होतं. सौरभच्या आवाजात हे गाणं ऐकून सलील कुलकर्णी भारावून गेले होते. त्यांनी सौरभचा व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त करत लिहिलं होतं की, “रे क्षणा थांब ना…गाताना क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर.. ज्यानं टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला हरवण्यासाठी आणि यूएसए संघाला सामना जिंकून देण्यासाठी शानदार सुपर ओव्हर टाकली. हा व्हिडीओ पाहून खूप भारी वाटतंय…एक सॉफ्टवेअर इंजिनिअर..जो भारतासाठी अंडर-१९ विश्वचषक खेळला आणि आता तो यूएस क्रिकेट संघाचा महत्त्वाचा भाग आहे… हा प्रवास नक्कीच सोपा नसेल…( असं मी एका प्रोफेशनल क्रिकेटपटू मुलीचा बाबा म्हणून सांगू शकतो. ( P.S – सौरभ… भावा..भारताबरोबर १२ तारखेला खेळताना just take it easy .. बाकी एरवी मग तुला full support आहेच. )
 

Salil Kulkarni 
 
दरम्यान, सलील यांनी सौरभसोबत ‘रे क्षणा थांब ना’ गाणं गायलं आहे. याचा व्हिडीओ त्यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला असून लिहिलं आहे, “रे क्षणा थांब ना .. ( एकदा काय झालं ) सौरभ नेत्रावळकर आणि सलील कुलकर्णी…साधेपणा या सुपर टॅलेंटेड गोलंदाजाला आणखी खास बनवतो. सौरभ नेत्रावळकर तुझा खूप अभिमान वाटतो…असाच सर्वांना प्रेरणा देत राहा.”
 

Salil Kulkarni 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121