‘बोईंग ७८७-८’ ड्रीमलायनर विमान अपघाताची कारणमीमांसा

    18-Jun-2025
Total Views |

‘एअर इंडिया’च्या ‘एआय-१७१’ या ‘बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर’ विमानाच्या नुकत्याच झालेल्या भीषण अपघाताने देशासह संपूर्ण जगालाही हादरवून सोडले. या दुर्घटनेमुळे हवाई प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, या अपघातामागची नेमकी कारणमीमांसा आणि विमान सुरक्षेबाबतचे जागतिक धोरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. त्यानिमित्ताने या अपघातामागील संभाव्य कारणे आणि उपाययोजना यांचे सखोल विचारमंथन करणे आवश्यक आहे.

विमान अपघाताची संभाव्य कारणे

प्राथमिक माहिती आणि उपलब्ध व्हिडिओ लिप्सवरून असे दिसते की, विमानाने धावपट्टीवरून ‘टेकऑफ’ घेतल्यानंतर काही क्षणांतच नियंत्रण गमावले. अशा घटनांमागे खरं तर अनेक कारणे असू शकतात. ‘टेकऑफ’ केल्यावर विमानाच्या ‘थ्रस्ट’ म्हणजेच वर आणि पुढे जाण्याच्या शक्तीत कमी आली. यालाच एव्हिएशन भाषेत ‘लॉस ऑफ थ्रस्ट’ असे म्हणतात. ‘एआय-१७१’ हे ‘बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर प्रकारातले विमान अहमदाबाद ते लंडनच्या प्रवासाकरिता जेव्हा तयार करण्यात आले असेल, त्या वेळेस काही मुद्दे गृहीत धरून तयारी केली गेली असेल. पहिले म्हणजे ज्यादा इंधन. कारण, पाकिस्तानची हवाई सीमा भारतासाठी बंद असल्याने विमानाचे उड्डाण लांब पल्ल्याचे होते. ‘एआय-१७१’च्या अहमदाबाद ते लंडनच्या प्रवासाकरिता विमानात एक लाख २५ हजार लीटर इतके पेट्रोल होते. दुसरी बाब म्हणजे हे विमान प्रवाशांनी पूर्ण भरलेले असल्याने सामानाचे वजन साहजिकच जास्त असणार. तिसरे, लागोपाठ उड्डाण असल्याकारणाने सर्व सिस्टम्स पूर्णपणे ‘ऑपरेशनल’ असणे गरजेचे होते व त्या अनुषंगाने सगळ्या चाचण्या केल्या गेल्या असणार. ‘ड्रीमलायनर’ हे ‘बोईंग’ कंपनीचे सर्वांत सुरक्षित आणि भरवशाचे विमान मानले जाते. परंतु, ‘बोईंग’ कंपनीमध्ये काही वर्षांपासून कर्मचार्यांची निदर्शने व वाढत्या खर्चामुळे सुरक्षा तपासण्या व अत्यावश्यक चाचण्यांना बगल दिल्याची माहितीही काही कर्मचार्यांनी दिली असे वृत्त आहे. अपघाताचे खरे कारण ‘एआयबी’च्या (एअर क्राफ्ट इन्वेस्टिगेशन बोर्ड) अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. परंतु, काही बाबींवर आपले लक्ष्य वेधण्याच्या दृष्टीने पुढील मुद्दे मांडणे गरजेचे आहे.

तांत्रिक बिघाड विशेषतः ‘फ्लाईट कंट्रोल सिस्टीम’मध्ये वैमानिक विशेषतज्ज्ञ तांत्रिक बिघाडाची शयता नाकारत नाही. पण, एक निक्षून लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे ‘बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर’ हे अतिशय सुरक्षित व ‘फिल्ड प्रूफ’ विमान म्हणून जगप्रसिद्ध आहे. ‘पायलट एरर’ जसे की, चुकीचा ‘टेकऑफ’ अॅन्गल किंवा गतीचे अनुमान चुकणे किंवा फ्लॅपची जागा चुकीची असणे वगैरे. पण, आजच्या नवीन जनरेशनच्या विमानांमध्ये सगळे काही संगणकाद्वारे संचालित असते आणि संगणक काही वेगळे किंवा गैर झाले, तर तसा इशाराही देतो. त्यामुळे ‘पायलट एरर’ची शयता फार कमी आहे. पण, ही बाब पूर्णपणे नाकारणे देखील गैर ठरेल. हवामान स्थिती जसे की, अचानक वार्याचा झटका (ुळपव ीहशरी) हे देखील एक कारण असू शकते. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे, तापमान आणि हवेचा वेग. दि. १२ जून रोजी बाहेरील तापमान ४० अंश सेल्सिअस होते. जसे तापमान वाढते, तशी विमानाला लागणारी हवेची घनता कमी होते आणि ‘लॉस ऑफ लिफ्ट’ची शयता खूप असते. ‘एआय-१७१’च्या वैमानिकांने जर ‘अॅन्गल ऑफ अटॅक’ वाढवला असेल आणि हवेची घनता कमी असेल, तर विमान वर जाण्याऐवजी खाली येईल. ‘बर्ड हिट’ अर्थात पक्षी विमानाला धडकून इंजिन बिघाडास कारणीभूत ठरू शकतात, त्याचीही शयता नाहीच्या बरोबर आहे. कारण, पक्षी जर इंजिनमध्ये अडकला किंवा शिरला, तर धूर दिसेल आणि ‘एआय-१७१’च्या कोणत्याही व्हिडिओमध्ये अशाप्रकारे धूर दिसत नाही. मात्र, हे सर्व घटक अपघात घडवून आणू शकतात. अंतिम निष्कर्ष मात्र काळजीपूर्वक केलेल्या तपासणीनंतरच समोर येईल.

‘बोईंग ७३७’ मॅस अपघातांनंतर बोईंगच्या सुरक्षा संस्कृतीवर प्रश्नचिन्ह

‘बोईंग ७३७’ मॅसचे दोन मोठे अपघात-’ङळेप अळी ऋश्रळसहीं ६१०’ (इंडोनेशिया, २०१८) आणि ’एींहळेळिरप अळीश्रळपशी ऋश्रळसहीं ३०२’ (इथिओपिया, २०१९) यांमध्ये ३४६ लोकांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही अपघातांमुळे ‘बोईंग’च्या ‘एमसीएएस’ सिस्टममधील दोष समोर आला. अनेक माजी कर्मचारी आणि सुरक्षा तज्ज्ञांनी नंतर सांगितले की, कंपनीच्या अंतर्गत सुरक्षा संस्कृतीत घसरण झाली होती.

‘बोईंग’ने नंतर या विमानामध्ये काही सुधारणाही केल्या. ‘सॉफ्टवेअर अपडेट’, ‘पायलट ट्रेनिंग मॉड्यूल्स’मध्ये बदल तसेच, ‘फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन’(एफएए)चा सहभाग वाढवला. मात्र, अनेकांच्या मते हे बदल दुरुस्तीनंतर झालेले आहेत आणि सक्रिय सुरक्षा संस्कृती अजूनही संपूर्णपणे साकारलेली नाही.

‘ड्रीमलायनर’च्या दृष्टीने हा पहिलाच घातक अपघात

‘बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर’ विशेषतः ७८७-८ मॉडेल हे श्रेपस-हर्रीश्र, ीुंळप-शपसळपश ुळवशलेवू विमान आहे. सुमारे २०११ सालापासून एक हजार, अशी १०० पेक्षा जास्त विमाने सेवेत आहेत आणि त्यांची कामगिरी चांगली राहिलेली आहे. ‘ड्रीमलायनर’ची खास वैशिष्ट्ये: उरीलेप-षळलशी लेािेीळींश र्ीीीींर्लीीींश - वजन कमी आणि इंधन कार्यक्षमता अधिक. चेीश-शश्रशलीींळल ीूीींशाी - पारंपरिक हायड्रॉलिक सिस्टमच्या जागी इलेट्रिक. अर्वींरपलशव र्रींळेपळली - उच्च दर्जाची नेव्हिगेशन आणि एअर डेटा सिस्टम. एपसळपश ेिींळेपी (ठेश्रश्री-ठेूलश ढीशपीं १०००/ॠएपु) - अत्याधुनिक आणि शांत इंजिन यामुळेच हा अपघात विशेष चिंतेचा विषय ठरत आहे. कारण, ‘ड्रीमलायनर’च्या सुरक्षेकडे आतापर्यंत विश्वासाने पाहिले जात होते.

अपघातामागे सायबर हॅकिंग किंवा घातपाताची शयता आहे का?

समाजमाध्यमांवर अनेकांनी विमान अपघातामागे ‘सिस्टम हॅकिंग’ किंवा सायबर हल्ल्याची शयताही व्यक्त केली आहे. आधुनिक विमाने ही ‘नेटवर्क-कनेटेड’ असतात. मात्र, ‘फ्लाईट कंट्रोल सिस्टम्स’ या कडकपणे आंतरजालापासून वेगळ्या (रळी-सरिशिव) ठेवलेल्या असतात. त्यामुळे थेट हॅकिंग अत्यंत कठीण आहे. तथापि, काही घटनांमध्ये अऊड-इ किंवा वायफाय नेटवर्कद्वारे हस्तक्षेप शय आहे. पण, यासाठी अत्यंत प्रगत सायबर कौशल्य आवश्यक असते आणि आतापर्यंत ‘बोईंग ७३७’ संदर्भात अशी कोणतीही सिद्ध घटना समोर आलेली नाही. परंतु, आजच्या नेटवर्क आणि ‘एआय’ आधारित प्रणालीचा वापर करून सिस्टम हॅकिंग काही अवघड नाही.

सुरक्षा तपासणी प्रक्रिया : त्रुटी कशा राहिल्या असाव्यात?

प्रत्येक उड्डाणापूर्वी एक ’झीश-ऋश्रळसहीं खपीशिलींळेप’ केली जाते. यात खालील गोष्टींचा समावेश असतो: एक्सटिरियर चेक - लॅण्डिंग गियर, विंग्स, इंजिन्स. इंटिरिअर चेक - कॉकपिट सिस्टम्स, कम्युनिकेशन, नेव्हिगेशन उपकरणे. फ्युएल, हायड्रॉलिक आणि ऑक्सिजन सिस्टम्स. ‘एआय-१७१’नेदेखील ही प्रक्रिया पूर्ण केली होती, अशी माहिती आहे. पण, काही त्रुटी जसे की, इंटरनल सिस्टममध्ये ’ळपींशीाळीींंशपीं षर्रीश्रीं’ - हे तत्काळ ध्यानी येत नाहीत. ’झेीीं-र्शींशपीं षश्रळसहीं वरींर रपरश्रूीळी’ने हे स्पष्ट होईल.

सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना

काय असाव्यात?

विमाननिर्मिती करताना ‘एआय’आधारित ’ीशरश्र-ींळाश हशरश्रींह ोपळीेींळपस’ प्रणाली. दुहेरी किंवा त्रैतीय प्रणाली जी एक बिघडली, तरी कार्यरत राहील. ’र्कीारप ऋरलीेीीं एपसळपशशीळपस’ - ’पायलट एरर’ टाळण्यासाठी सोपी आणि प्रभावी यंत्रणा. याशिवाय, तृतीय पक्षांचे स्वतंत्र ऑडिट्स आणि ’ीरषशीूं ीर्ळाीश्ररींळेपी’ गरजेचे आहेत.

’डीजीसीए’ आणि सरकारने कोणते सुधार, बदल करावेत?

भारतात ‘डीजीसीए’ चा सहभाग केवळ विमानाला हवाई वाहतुकीचे प्रमाणपत्र आणि तपासणीत मर्यादित आहे. त्यामुळे पुढील बदल गरजेचे वाटतात. ‘एआय’ आणि ‘मशीन लर्निंग’ वापरून आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत सामंजस्य अधिक वाढवायला हवे.

वातानुकूलन आणि मनोरंजन प्रणालींचा उड्डाणावर परिणाम होतो का?

या अपघाताच्या आधी काही प्रवाशांनी एसी,  बंद असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या प्रणाली मध्ये मोडतात. त्यामुळे त्यांचा उड्डाणावर थेट परिणाम होत नाही. मात्र, हे संकेत असू शकतात की, विमानाच्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये काही बिघाड असू शकतो. अशा तक्रारींची गांभीर्याने दखल घेणे आणि अत्यंत आवश्यक आहे.

व्यावसायिक दबावामुळे सुरक्षेचा बळी?

‘एअरबस’ आणि ‘बोईंग’मध्ये विमानाची किंमत आणि विमानाची मागणी केल्यानंतर संबंधित कंपनीला तो विमान पुरवठा करण्यासाठी लागणारा कालावधी, यासंदर्भात तीव्र स्पर्धा सुरू आहे. शिवाय, विमान कंपन्यांवर ’र्ढीीपर्रीेीपव ढळाश’ कमी ठेवण्याचा दबाव आहे. विमानाची देखभाल-दुरुस्ती करणार्या चमूचे मनोबल आणि कामातील ज्ञानाचे जतन करणे आणि वाढवणे ही ‘मशीन मेंटेनन्स’ची गुरुकिल्ली आहे. व्यावसायिक आणि आर्थिक दबावामुळे या गोष्टींचा अभाव बर्याच वेळा कर्मचार्यांच्या कुरबुरींमधून व्यक्त झाला. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे, सुरक्षेवर अनावश्यक तडजोड. आर्थिक व्यवहार्यता आणि सुरक्षा उपाययोजना यांचा योग्य तो समतोल राखणे आवश्यक आहे. आज आपण या बाबींवर निष्कर्षाकडे जाऊ शकत नाही. अपघाताच्या संपूर्ण आणि सखोल तपासाअंतीच आपल्याला याबाबत अधिक स्पष्टता मिळेल.

निष्कर्ष

‘एआय-१७१’चा अपघात ‘ड्रीमलायनर’प्रमाणे अत्याधुनिक विमानांनाही एकप्रकारे धक्का देणारा आहे. यानिमित्ताने हे लक्षात घेतले पाहिजे की, प्रवासी सुरक्षेशी तडजोड कोणत्याही परिस्थितीत होऊ नये. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उद्योगातील पारदर्शकता आणि उत्तम सुरक्षा संस्कृती हीच एकमेव दिशा आहे. या घटनेचा सखोल अभ्यास, दोषींची जबाबदारी आणि भविष्यासाठी सुधारणा हाच एक मार्ग सुरक्षिततेबद्दलचा आहे.  योग्य नाही. एकूणच काय तर आकाशात वेगवान भरारी घेताना सुरक्षिततेचे भान ठेवणे क्रमप्राप्त.


विंग कमांडर (नि) अविनाश मुठाळ