संगीतप्रेमींसाठी आनंदाची बातमी! SNDT विद्यालयात सुगम संगीत प्रमाणपत्र कोर्स सुरू
18-Jul-2024
Total Views | 57
मुंबई : चर्चगेट येथील एस.एन. डी. टी. (SNDT) कॉलेज ऑफ आर्ट्स आणि एस. सी. बी. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स फॉर वूमन या महाविद्यालयात सुगम संगीत प्रमाणपत्र कोर्स सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या १ ऑगस्टपासून हा कोर्स सुरु करण्यात येणार आहे.
सुगम संगीत प्रमाणपत्र कोर्स हा एक वर्षाचा असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनींसाठी तो खुला आहे. या कोर्सकरिता प्रवेश घेण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही आणि हा कोर्स फक्त महिलांसाठी उपलब्ध आहे. या कोर्सच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय संगीताचे मूलभूत ज्ञान, विविध प्रकारचे राग आणि ताल, वाद्य वादन (इच्छेनुसार), गायन आणि संगीत रचना इत्यादी गोष्टी शिकवल्या जातील.
संगीत कौशल्ये विकसित करणे, सर्जनशीलता वाढवणे आणि आपला आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीने हा सर्वोत्तम कोर्स आहे. या कोर्ससंबंधीच्या अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधता येईल.