रत्नागिरी - देवीहसोळच्या सड्यावरील पाण्याच्या डबक्यांमधील 'हे' गुपित उलगडले !

    10-Apr-2025
Total Views |

rock pools of the Devihasol plateau

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कातळ सड्यावरील पाण्याचा डबक्यांचा आकार हा त्याठिकाणी वाढणाऱ्या बेडूकमाशांच्या संख्येवर परिणाम करत असल्याचे संशोधन संशोधकांनी केले आहे (rock pools of the Devihasol plateau). रत्नागिरी जिल्ह्यातील देवीहसोळच्या सड्यावर हे संशोधन पार पडले (rock pools of the Devihasol plateau). यामध्ये संशोधकांनी देवीहसोळच्या सड्यावरील पाण्याच्या हंगामी डबक्यांचा आकार, पावसाची वारंवारता आणि शिकारी प्राणी या तीन घटकांचा परिणाम बेडूकमाशांच्या वाढीवर कसा होतो याचा उलगडा झाला आहे. (rock pools of the Devihasol plateau)

कातळ सड्यावर नैसर्गिक पद्धतीनेच लहान मोठ्या आकाराची पाण्याची डबकी तयार झालेली असतात. ही डबकी पावसाळ्यात पाण्याने भरतात. पाण्याने भरल्यानंतर या डबक्यांमध्ये हंगामी स्वरुपात काही जीव राहतात, तर काही जीवांचे प्रजनन होते. खास करुन बेडूक या डबक्यांमध्ये अंडी घालतात आणि त्याचठिकाणी अंड्यातून बाहेर पडणारे बेडूकमासेही वाढतात. देवीहसोळच्या सड्यावरील याच पावसाळी डबक्यांमध्ये बेडूकमाशांच्या अधिवासाचा अभ्यास संशोधक जिथीन विजयन आणि रोहित नानिवडेकर यांनी केला होता. त्यावर आधारित संशोधन लेख प्रसिद्ध झाला आहे.

जिथीन यांनी देवीहसोळच्या किनाऱ्यावरील दहा पावसाळी डबक्यांना केंद्रस्थानी ठेवून अभ्यास करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांनी सर्वप्रथम डबक्यांचा आकारांची नोंद केली. या डबक्यांमध्ये कोणत्या प्रजातीचे बेडूकमासे सापडतात त्यांची नोंद केली. त्यानंतर डबक्याच्या आकाराचा, पावसाचा आणि शिकारी प्राण्यांचा बेडूकमाशांच्या विपुलतेवर परिणाम पडतो का, याचा मागोवा घेतला. त्यांना देवीहसोळच्या पावसाळी डबक्यांमध्ये जलधारा स्किटरिंग बेडूक, निल्फामरी नॅरो-माऊथ बेडूक आणि काॅमन इंडियन ट्री बेडूक या तीन प्रजातीच्या बेडकांच्या बेडूकमाशांची ओळख पटवता आली. संशोधकांना सर्व तलावांमध्ये जलधारा स्किटरिंग बेडकाचे बेडूकमासे सापडले, तर आठ डबक्यांमध्ये इतर दोन प्रजातीचे बेडूकमासे आढळले. एका डबक्यामध्ये नॅरो माऊथ बेडकाच्या बेडूकमाशाची कमाल संख्या साधारण १६००, जलधारा स्किटरिंग बेडकाची ६६५ आणि नॅरो माऊथ बेडकाची साधारण १३० होती.

खेकडे, पाणकिडे, मासे पकडणारा कोळी आणि चतुरांच्या अळ्या, असे बेडूकमाशांना खाणारे शिकारी प्राणी आम्हाला आढळले, मात्र या शिकारी प्राण्यांमुळे डबक्यातील बेडूकमाशांच्या विपुलतेवर वा विकासावर कोणाताही परिणाम न झाल्याचे निरीक्षण टिपल्याचे विजयन यांनी सांगितले. डबक्यातील बेडकांच्या विपुलतेवर सर्वाधिक परिणाम हा डबक्यांचा आकार आणि पावसाचे प्रमाण या दोन घटकांचा पडल्याचे ते म्हणाले. तसेच आता सड्यांवर उभ्या केल्या जाणाऱ्या काजू-आंब्याच्या बागांमुळे पाण्याची डबकी नष्ट होत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे.