पर्यटकांनी गजबजलेल्या किहिम किनाऱ्यावर सागरी कासवाने घातली अंडी

    04-Mar-2025
Total Views |
turtle nest found in kihim



मुंबई (विशेष प्रतिनिधी) - रायगड जिल्ह्यातील पर्यटकांनी गजबजलेल्या किहीमच्या किनाऱ्यावर मंगळवार दि. ४ मार्च रोजी सागरी कासवाचे घरटे आढळले (turtle nest found in kihim). सागरी कासवाच्या मादीने भर दुपारी लोकांच्या समक्ष किनाऱ्यावर येऊन अंडी घातली आणि त्यानंतर समुद्रात निघून गेली (turtle nest found in kihim). कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागाने हे घरट संरक्षित केले आहे. (turtle nest found in kihim)
 
 
राज्याच्या किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमधील काही प्रमुख किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची घरटी आढळतात. रायगडमधील चार, रत्नागिरीतील २३ आणि सिंधुदुर्गमधील ३० किनाऱ्यांवर आॅलिव्ह रिडेल प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. रायगडमधील दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि मारळ या उत्तरेकडील किनाऱ्यांवर सागरी कासवांची घरटी प्रामुख्याने आढळतात. मात्र, मंगळवारी अलिबाग तालुक्यातील किहीमच्या किनाऱ्यावर सागरी कासवाचे घरटे आढळून आले. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या मादीने भर उन्हात लोकांच्या समक्षच किनाऱ्यावर खड्डा करुन त्यात अंडी घातली.
 
 
सागरी कासवांच्या माद्या या प्रामुख्याने रात्री आणि लोकांचा वावर नसताना किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतात. मात्र किहीमच्या किनाऱ्यावर भर उन्हात मादीने अंडी घातली. सरपंच प्रसाद गायकवाड यांनी यासंबंधीची माहिती वन विभागाला कळवल्यानंतर कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागाचे अलिबाग वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल समीर शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. विभागीय वन अधिकारी कांचन पवार यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत त्यांनी या घरट्याचे इन-सेटू पद्धतीने संरक्षण करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच अंड्यांना आहे त्याच ठिकाणी ठेवून त्याभोवती जाळी लावून घरट्याला संरक्षण देण्यात आले आहे. तसेच संरक्षणासाठी बीच-मॅनेजरची नियुक्ती करण्यात आली आहे. यामधून साधारण ५० ते ६० दिवसानंतर पिल्ले बाहेर पडण्याची शक्यता आहे.