मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Citizenship Certificate Pakistani Hindu) राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यात भारतीय नागरिकत्वासाठी दीर्घकाळ संघर्ष करणाऱ्या पाकिस्तानी हिंदू स्थलांतरितांना अखेर यश आले आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांना राज्य सरकारने नुकतेच नागरिकत्व प्रमाणपत्र दिले आहे. जिल्हा प्रशासनाने एकूण ३८१ पाक हिंदूंना नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याची माहिती आहे. भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांचा एकाअर्थी पुनर्जन्म झाल्याची भावना पाकिस्तानी हिंदूंकडून व्यक्त करण्यात आली आहे.
हे वाचलंत का? : 'श्री शिवाजी नाट्यमंदिर'च्या कार्यकारिणीतून ज्ञानेश महाराव यांची हकालपट्टी होणार?
चंपाबाई आणि हवाबाई या दोघी २००७ मध्ये पाकिस्तानातून स्थलांतरित झाल्या होत्या. त्यांना जेव्हा भारतीय नागरिकत्व मिळाले, तेव्हा त्या म्हणाल्या, "पूर्वी जेव्हा मी माझ्या भविष्याचा विचार करायचे तेव्हा ते अंधकारमय वाटायचे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील मुलींना शिक्षण आणि वाढीसाठी प्रोत्साहनच देत नाहीत, तर संधीही देत आहेत. आजपासून मीही या देशाची नागरिक झाले आहे. त्यामुळे मलाही शिक्षणाच्या सर्व संधी मिळतील.
जिल्हाधिकारी गौरव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनेनुसार एकूण ३७८ जणांना नागरिकत्व देण्यात आले आहे. ज्यांचे आधी अर्ज आले होते त्यांना हे नागरिकत्व देण्यात आले आहे. नव्या कायद्यानंतर स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आहे, मात्र सध्या जुने अर्ज असलेल्यांनाच नागरिकत्व दिले जात आहे. उर्वरित लोकांना लवकरच भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे.