मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अमेरिकेने भारताला तब्बल २९७ ऐतिहासिक वस्तू औपचारीकरित्या परत केल्या आहेत. या वस्तु तस्करी करून भारताबाहेर नेल्या गेल्या होत्या. या वस्तु लवकरच भारतात परत आणल्या जाणार आहे. पंतप्रधानांनी आपल्या ‘एक्स’ हॅंडलवरुन या वस्तु परत करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे आभार मानले आहेत. “सांस्कृतिक संबंध वाढवणे आणि सांस्कृतिक मालमत्तेच्या अवैध तस्करीविरुद्ध लढा मजबूत करणे. भारताला 297 मौल्यवान पुरातन वास्तू परत दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि यूएस सरकारचा अत्यंत आभारी आहे.” अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी ‘एक्स’ वर दिली आहे.
एका सर्वेक्षणानुसार २०१४ पासून आतापर्यंत भारताला आपल्या एकूण ६४० ऐतिहासिक परत मिळाल्या आहेत. त्यापैकी ५७८ वस्तू अमेरिका, १६ ब्रिटेन, ४० ऑस्ट्रेलिया आणि अन्य देशांकडून परत मिळाल्या आहेत.