प्रियंका गांधी वाड्राच्या निकटवर्तीयाने अल्पवयीन मुलीचे केले लैंगिक शोषण
02-Sep-2024
Total Views |
लखनऊ : उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील एका काँग्रेस कार्यकर्त्याने घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केला होता. आरोपीचे नाव मुफ्ती मेहँदी असून काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. पीडित महिलेवर गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेस नेता लैंगिक शोषण करत आहे. याप्रकरणाची माहिती पोलिसांनी कळताच पोलिसांनी संबंधित काँग्रेस नेत्यावर ३१ ऑगस्ट २०२४ रोजी एफआऱ आय दाखल केली असून २ सप्टेंबर रोजी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
घडलेली घटना ही उत्तर प्रदेशातील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील आहे. काँग्रेस नेत्याविरोधात केलेल्या तक्रारीत लिहिलण्यात आले की, काँग्रेस नेत्याने गेल्या १० वर्षांपासून लैंगिक शोषण केले होते. वयाच्या पंधराव्या वर्षी पीडितेवर लैंगिक शोषण केले होते. तसेच यावेळी काँग्रेस नेत्याने पीडितेशी गोडगुलाबी गप्पा मारत पीडितेला विश्वासात घेतले होते. पीडितेला अनेकदा हव्या असणाऱ्या गोष्टी पुरवण्यात आल्या होत्या. त्यानंतर पी़डितेवर विवाह करेल असे सांगून लैंगिक अत्याचार सुरूच ठेवले.
या घटनेनंतर पीडितेने काँग्रेस नेत्यास विवाह करण्याची मागणी केली. तिने काँग्रेस नेत्याला विवाह करण्यासाठी दबाव आणला होता. मात्र सुरूवातीस त्याने पीडित मुलीकडे दुर्लक्ष केले होते. याप्रकरणात आरोपीने पीडितेचे अनेक अश्लील फोटो काढले होते. हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी पीडितेला देण्यात आली होती.
दरम्यान मुफ्ती मेहंदीने २७ ऑगस्ट रोजी पीडितेवर लैंगिक अत्याचार केला होता. जर याप्रकरणाबाबत कोणाला काही सांगितले तर तुझ्या परिवासार ठार करेल अशी माहिती पीडितेने दिली आहे. या घडलेला प्रकरणाची माहिती पीडितेने आपल्या आईला माहिती सांगितली होती.
यावेळी पीडितेच्या आईने पोलीस ठाणे गाठून आरोपीवर तक्रार दाखल केली. आरोपी मेहंदीवर भारयीत न्यायसंहिता कलम ६४, ११५(२) आणि ३५१ (३) आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.