धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा !

- खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे आंतरराष्ट्रीय मंचावरून आवाहन - दहशवादाविरोधात आता शून्य सहिष्णुता; पाकिस्तानला थेट इशारा सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा सिएरा लिओनचा दौरा यशस्वी

    31-May-2025
Total Views | 16

धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा !

कल्याण : पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथे जेव्हा हल्ला झाला, तेव्हा दहशतवाद्यांनी लोकांची धर्म विचारून हत्या केली. ते हिंदू आहेत का, मुस्लिम आहेत का, हे तपासून मग त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यांचा उद्देश म्हणजे भारतातील सामाजिक सलोखा बिघडवणे. हा दहशतवाद्यांचा तसेच पाकिस्तानचा हेतू स्पष्ट होता. धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा, असा इशारा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सिएरा लिओन येथून पाकिस्तानला दिला. तर याच पार्श्वभूमीवर आता भारताने ' दहशवादाविरोधात आता शून्य सहिष्णुता '' धोरण अवलंबिले आहे, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या राजनैतिक प्रयत्नांचा भाग म्हणून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सिएरा लिओन या देशाला २८ ते ३० मे २०२५ दरम्यान भेट दिली. या भेटीमागील उद्दिष्ट जागतिक स्तरावर दहशतवादाच्या गंभीर धोक्याविषयी जनजागृती करणे व आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवणे हे होते. या शिष्टमंडळाने सिएरा लिओनमधील विविध उच्चपदस्थ व्यक्तींशी विस्तृत चर्चा केली. यात संसदाध्यक्ष, संसद सदस्य व परराष्ट्र विषय समिती, संरक्षण उपमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक, कार्यवाह परराष्ट्र मंत्री तसेच सिएरा लिओनचे उपराष्ट्रपती यांचा समावेश होता. भारताचा दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता धोरण या बैठकांमध्ये अधोरेखित करण्यात आले आणि दहशतवादविरोधी जागतिक ऐक्याची आवश्यकता ठळकपणे मांडण्यात आली.

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा सिएरा लिओनच्या संसदेने तीव्र शब्दांत निषेध केला आणि हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांसाठी मौन पाळून श्रद्धांजली देखील वाहण्यात आली.

सिएरा लिओनचे उपराष्ट्रपती डॉ. मोहम्मद जुलडेह जल्लोह, यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारतातील दहशतवादी हल्ल्यातील मृत्युमुखी नागरिकांप्रती शोक व्यक्त केला आणि भारतासोबत ऐक्य दर्शवले. संरक्षण उपमंत्री कर्नल (निवृत्त) मुआना ब्रिमा मासाकोयी आणि विरोधी पक्षाचे उपनेते डॅनियल ब्रिमा कोरोमा यांनीही दहशतवादाचा तीव्र निषेध करत भारताच्या भूमिकेला ठाम पाठिंबा दर्शवला. मंत्री मासाकोयी यांनी अफ्रिकन देशांनीही त्वरित एकत्र येऊन दहशतवादाविरुद्ध लढण्याची गरज असल्याचे नमूद केले.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सिएरा लिओनमधील विविध परदेशी राजनयिक अधिकाऱ्यांशी संवाद साधत दहशतवादविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णायक कारवाईची गरज अधोरेखित केली. भारताविरुद्ध सीमापार दहशतवादी कारवाया घडवणाऱ्या, पाठिंबा देणाऱ्या व प्रायोजित करणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले.

या शिष्टमंडळाने सिएरा लिओनमधील स्थानिक प्रसारमाध्यमे व भारतीय समुदायाशी संवाद साधला आणि भारत व सिएरा लिओनमधील दृढ मैत्रीचे पुन्हा एकदा स्मरण करून दिले. या भेटीचा समारोप संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि इतर जागतिक मंचांवर दहशतवादाविरोधात समन्वित कारवाई करण्याच्या आणि आंतरराष्ट्रीय शांततेच्या रक्षणासाठी पुढाकार घेण्याच्या आवाहनासह झाला.




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121