"राहुल गांधींचे 'मॅच फिक्सिंग'चे आरोप हास्यास्पद!"; केंद्रीय निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

    07-Jun-2025   
Total Views | 14

ECI Slams Rahul Gandhi’s Allegations on Maharashtra Polls as Baseless)
 
नवी दिल्ली : (ECI Slams Rahul Gandhi’s Allegations on Maharashtra Polls as Baseless) काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 'मॅच फिक्सिंग महाराष्ट्र' या नावाने लिहिलेल्या लेखात, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये गैरप्रकार भाजपाकडून गैरप्रकार करण्यात आल्याचे आरोप केले. राहुल गांधींच्या या आरोपांना केंद्रीय निवडणूक आयोगाने सडेतोड प्रत्युत्तर दिले असून, त्यांचे आरोप कायद्याचा अपमान करणारे असल्याचे म्हटले आहे.
 
 
 
दरम्यान, राहुल गांधींच्या आरोपांना निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर सार्वजनिकरित्या उपलब्ध करण्यात आले आहे."महाराष्ट्रातील मतदार याद्यांवर उठवले जाणारे निराधार आरोप कायद्याच्या राज्याचा अपमान करणारे आहेत. निवडणूक आयोगाने २४ डिसेंबर २०२४ रोजी काँग्रेसला दिलेल्या उत्तरात ही सर्व तथ्ये समोर आणली होती. जी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. असे दिसते की, असे मुद्दे वारंवार उपस्थित करताना या सर्व तथ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे." असे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे.
 
या पत्रात पुढे असेही म्हटले आहे की, "कोणाकडूनही पसरवण्यात येणारी चुकीची माहिती केवळ कायद्याचाच अनादर नाही तर त्यांच्या राजकीय पक्षाने नियुक्त केलेल्या हजारो प्रतिनिधींची बदनामी करणारी आहे. असे प्रकार निवडणुकीदरम्यान अथक आणि पारदर्शकपणे काम करणाऱ्या लाखो निवडणूक कर्मचाऱ्यांना निराश करणारे आहेत. मतदारांच्या कोणत्याही प्रतिकूल निकालानंतर, निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे आरोप करणे म्हणजे निवडणूक आयोगाची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. जो पूर्णपणे हास्यास्पद आहे."

 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121