ANI v. Mohak Mangal : दिल्ली उच्च न्यायालयाने दिले ‘तो’ व्हिडिओ हटविण्याचे आदेश

    31-May-2025
Total Views | 10
Supreme court has asked Mohak Mangal to remove video which include ANI defamation

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘आरजी कर केस’ प्रकरणी व्हिडिओ तयार करताना ‘एएनआय’ वृत्तसंस्थेचे छायाचित्रण वापरले म्हणून मोहक मंगल या युट्यूबर विरोधात कारवाई करण्यात आली आहे. मंगल यांच्यावर ‘एएनआय’ने कॉपीराईट उल्लंघनाचा आरोप केला असून त्याविरोधात दंड म्हणून ४० लाख रुपयांची मागणी केली होती.

याच प्रमाणे कथित कॉमेडीयन कुणाल कामरालाही ‘एएनआय’ने कॉपीराईट स्ट्राईक पाठवत दंडाची मागणी केली आहे. याच शिवाय दोघांनीही एएनआयची बदनामी करण्याचाही आरोप करण्यात आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली.

एएनआयच्या तक्रारीवरुन युट्यूबने कॉपीराईट स्ट्राईक दिला होता. या प्रकरणात मोहक मंगल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परिणामी न्यायालयाने युट्यूबरला व्हिडिओ हटविण्याचे निर्देश दिले आहेत. ‘एएनआय’चा व्हिडिओ परवानगीविना वापरल्याचा ठपका युट्यूबर विरोधात ठेवण्यात आला आहे. मात्र, हा वापर ‘फेअर युज’ या संकल्पनेखाली वकरण्यात आलाचा प्रतिवाद त्याने केला. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने मोहक यांचे काही व्हिडिओ हटविण्यास सांगितले होते. ज्यात एएनआयच्या व्हिडिओचा वापर चुकिच्या पद्धतीने आणि बदनामी करण्यासाठी वापरल्यात आल्याचे म्हटले होते. मात्र, मोहक मंगल यांनी, ‘आपण हा लढा अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे. हा लढा फक्त माझ्या एकट्याचा नसून प्रत्येक स्वतंत्र पत्रकार आणि क्रिएटर्सचा आहे,’ असेही तो म्हणाला.

फेअर युझ म्हणजे काय?


युट्यूब व्हिडिओ कॉपीराईट पॉलीसी अंतर्गत फेअर युझ ही संज्ञा सांगितली आहे. ज्यात दोन युट्यूबर (क्रिएटर्स) एकमेकांच्या व्हिडिओचे काही अंशी भाग हे व्हिडिओत दाखवू शकतो. मात्र, ते जसेच्या तसे वापरण्यास मनाई आहे. क्रिएटर्सला त्यात अँकरींग किंवा व्हॉईस ओव्हर द्यावा लागतो. या अंतर्गत वापरलेले व्हिडिओ फेअर युझ या संज्ञेखाली येतात. मात्र, बऱ्याचदा या संज्ञेचा गैरवापर करुन व्हिडिओ जसेच्या तसे कॉपी करण्याचे प्रकार केले जातात. या नियमांचा विचार व्हायला हवा, अशी चर्चा या निमित्ताने होऊ लागली आहे.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121