_202505311342254291_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
दुबई : पहलगाममध्ये हिंदूंवर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर सर्वस्तरातून टीका होत असताना केरळ कम्युनिटीच्या एका व्हिडिओमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. केरळ कम्युनिटीने दुबईत एका कार्यक्रमात चक्क पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा सत्कार केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. भारताविरोधात सतत गरळ ओकणाऱ्या शाहीद आफ्रिदीचे स्वागत केरळच्या एका समुदायने केल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
वादग्रस्त क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने वारंवार काश्मीर आणि भारताविरोधात वक्तव्य करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. इतकेच नव्हे तर भारतीय लष्कराविरोधातही सातत्याने टीका करतो. भारतीयांमध्ये आफ्रिदीविरोधात प्रचंड संताप आहे. या प्रकरणाबद्दल अद्याप केंद्र सरकारतर्फे अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दुबईत आयोजित केलेल्या ‘ईद मिलन’ कार्यक्रमात आफ्रिदी प्रमुख पाहूणा होता. केरळ कम्युनिटीतर्फे त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. केरळ समुदायातील उपस्थितांनी त्याच्यासोबत फोटोही काढले.
दरम्यान, याबद्दलचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रचंड टीका झाली. ‘असे करताना तुम्हाला जराही शरम वाटली नाही का?’, असा जाब भारतीयांनी विचारला आहे. “भारतीय आहात ना! देशाच्या विरोधात बोलणाऱ्यांना का निमंत्रण देता?”, असा जाबही विचारला आहे. दरम्यान, आयोजकांनी आपली बाजू स्पष्ट करत अजबच तर्क मांडला आहे. “हा कार्यक्रम राजकीय नव्हता. सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम म्हणून आम्ही याकडे पाहतो. आफ्रिदी क्रिकेटमधील मोठा चेहरा आहे, म्हणून त्याला आम्ही बोलावले.” या वक्तव्यानंतरही आयोजकांवर टीका करण्यात आली आहे. केरळ कम्युनिटीतील लोकांना देशापेक्षा सेलिब्रिटी मोठे वाटू लागलेत, अशा शब्दांत त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.