अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात जस्टिन बीबरच्या गाण्यांवर थिरकले बॉलिवूडकर

    06-Jul-2024
Total Views |

anant radhika 
 
 
 
मुंबई : सुप्रिसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा विवाह सोहळा लवकरच मुंबईत थाटामाटात संपन्न होणार आहे. याच निमित्ताने प्री-वेडिंगच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून ५ जूलैला संगीत सोहळा झाला. या सोहळ्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळींनी हजेरी लावत आपल्या नृत्याने चार चांद लावले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्याला कलाकार, खेळाडू, उद्योगपती यांनी हजेरी लावली होती. याशिवाय पॉप सिंगर जस्टिन बीबरने त्याच्या परफॉर्मन्सने या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.
 
 
anant radhika
 
जस्टिनच्या या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रत्येक कलाकार त्याच्या गाण्यावर थिरकताना दिसले. यापुर्वी जामनगरमध्ये झालेल्या अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग मध्ये रिहानाने परफॉर्म केलं होतं. दरम्यान, जस्टिनने अंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील परफॉर्मन्ससाठी १० मिलियन डॉलर म्हणजे भारतीय चालनानुसार ८३ कोटी ५० लाख रुपयांचं मानधन घेतल्याचे सांगितले जात आहे.