अर्थसंकल्पात महिलांसाठी काय? वाचा सविस्तर...

    23-Jul-2024
Total Views |
 
Budget
 
नवी दिल्ली : मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी संसदेत पहिला अर्थसंकल्प सादर केला. यात महिला, तरुण, गरीब आणि शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. दरम्यान, मोदी सरकारने नारी शक्तीला ३ लाख कोटी समर्पित केले आहेत.
 
या अर्थसंकल्पात नोकरदार महिलांसाठी वसतिगृह स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी ३ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, "नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे आणि बालसंगोपन शिशू गृह उभारून आम्ही महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न करणार आहोत."
 
हे वाचलंत का? -  राज्यानंतर केंद्राचीही 'लाडकी बहिण आणि लाडका भाऊ योजना'!
 
तसेच महिलांसाठी अर्थसंकल्पात विशिष्ट कौशल्य कार्यक्रमांचेही आयोजन केले जाईल. महिला स्वयंसहाय्यता गट उपक्रमांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच महिलांच्या नावे मालमत्ता खरेदी करण्यासाठी नोंदणी करताना आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात सवलत देण्याची घोषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महिला आणि मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी सरकारने ३ लाख कोटी रुपयांहून अधिक तरतूद केली आहे.