पराभव पचवता येईना! बैठकीतच काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या हाणामारीला सुरुवात!

    08-Jun-2024
Total Views |
Congress workers clash in Thrissur

नवी दिल्ली :
केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भाजपचा पहिल्यांदा विजय झाला. ज्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. याबाबत दि. ७ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा कार्यालयात काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथा-बुक्यांनी मारले. मुळात पराभवाचे खापर एकमेंकावर फोडल्यामुळे ही हाणामारी झाले.

याप्रकरणी पोलिसांनी एकूण २० काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांविरोधात एफआयआर नोंदवून तपास सुरु केला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा काँग्रेस कार्यालयात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष जोशे वल्लूर, सरचिटणीस संजीवन कुरीचिरा यांचीही उपस्थिती होती. 
संभाषणादरम्यान कुरीचिरा यांनी काँग्रेसच्या पराभवासाठी जोशे वल्लूर आणि काँग्रेसचे माजी खासदार टीएन प्रतापन यांना जबाबदार धरले. त्यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे जिल्हाध्यक्ष जोसे वल्लूर व त्यांचे समर्थक संतप्त झाले. या सर्वांनी एकत्र येत जिल्हा सरचिटणीस संजीवन यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान काहींनी संजीवन यांना मारहाणीपासून वाचवले. यावेळी काही व्यक्तींनी या घटनेचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर टाकला. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
त्यानंतर संजीवन यांनी पोलिस ठाण्यात जाऊन जोशी जोशे वल्लरू आणि त्यांच्या १९ साथीदारांविरुद्ध एफआयआर दाखल केला. हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध जामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रथमच काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. भाजपचे सुरेश गोपी यांनी त्यांचे विरोधक कम्युनिस्ट पार्टीचे उमेदवार सुनील कुमार यांचा ७४,००० मतांनी पराभव केला आहे. काँग्रेसचे उमेदवार के. मुरलीधरन येथे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना एकूण ३ लाख २८ हजार १२४ मते मिळाली. या पराभवानंतर काँग्रेसच्या उमेदवाराला राजकीय जीवनातून निवृत्ती जाहिर करण्यात आली आहे.