नुकतेच प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “भाजप मनुवादी म्हणून त्यांच्याशी समझोता करणार नाही. तसेच, पुरोगामी पक्षाशी युती करण्याचे प्रयत्नही मी केले.” याचाच अर्थ तथागत गौतम बुद्धांच्या स्मृती पुन्हा मिळवण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लंडनचे घर असू दे की, इंदू मिल प्रकरण असू दे; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींचा गौरव करणे, पक्षाच्या सत्ताकाळात इतर मागासवर्गीय समाजाच्या मोदींना पंतप्रधान, अनुसूचित जमातीच्या द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणे, हा मनुवाद ठरतो
Read More
काँग्रेसला देशाच्या स्वातंत्र्याचा वारसा मिळाला. त्याचबरोबर ब्रिटिशांचा ‘फोडा आणि राज्य करा’ हा अवगुणही काँग्रेसने घेतला. याच नीतीने त्यांनी देशातील हिंदूंना जातीपातींमध्ये विभागून राज्यसत्तेचे सुख उपभोगले. आज ज्या राज्यांमध्ये काँग्रेस सरकार आहे, तिथे अजूनही याच नीतीचा अवलंब काँग्रेस पक्ष करताना दिसतो. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याचे ताजे विधान काँग्रेसच्या याच ब्रिटिश वारशाचा परिचय देणारे!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील यशोभूमी येथे आशियातील सर्वात मोठ्या दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञान कार्यक्रम ‘इंडिया मोबाइल काँग्रेस (आयएमसी) 2025’ च्या नवव्या आवृत्तीचे उद्घाटन केले. या प्रसंगी पंतप्रधानांनी देशातील स्टार्टअप्स, संशोधक आणि नवोन्मेषकांच्या कार्याचे कौतुक करत सांगितले की, भारताचे तांत्रिक भविष्य सक्षम हातांमध्ये आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेसचे नेता असद खान जिलानी याने भारतमातेला ‘डायन’ म्हणून संबोधणे, एका संपूर्ण राजकीय पक्षाच्याच विचारसरणीतील अधःपतनाचे स्पष्ट उदाहरण ठरते. खरेतर भारतमातेचा अपमान हा कोणत्याही राजकीय मतभेदांपलीकडचा विषय. जिलानीच्या वक्तव्यातून केवळ देशाचाच नव्हे, तर पक्षातील राजकीय मार्गदर्शनाचा अभावही अधोरेखित झाला. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की, काँग्रेस आपल्या नेत्यांना नेमके काय शिकवते? देशप्रेम, संविधानाचा आदर हे सारे काँग्रेससाठी राजकारणाचे मुद्दे झाले आहेत का? धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली राष्ट्
चुकीचे कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी शिष्टमंडळ बैठकीत दिल्याची माहिती महसूलमंत्री तथा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
आजचा दिवस एकाअर्थाने विशेषच म्हणावा लागेल. आज २ ऑक्टोबर, महात्मा गांधी यांची जयंती आणि विजयादशमीसुद्धा. म्हणजे एकीकडे अहिंसेच्या मार्गाचे पुरस्कर्ते गांधीजी आणि दुसरीकडे राक्षसी रावणाचा संहार करणारे प्रभू श्रीराम! महात्मा गांधींचे नाव घेत, काँग्रेसने कायमच अहिंसेचा केवळ बुरखा पांघरला, तर प्रभू श्रीरामांचे अस्तित्वच मुळी काँग्रेसला मान्य नसल्यामुळे, रामचरित्रातील आदर्श घेण्याचा दुरन्वयानेही संबंध नाहीच. परवा देशाचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केलेल्या अशाच एका गौप्यस्फोटामुळे काँग्रेसच्या गांधीगिरी नव्ह
सिमलापासून जवळच असलेल्या लिम्ब्डा गावात १२ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. त्याच्या पालकांच्या मते त्याने गावातील एका सवर्ण महिलेच्या घराला स्पर्श केला होता. ते सहन न होऊन तीच्यासह आणखी दोघीजणींनी त्याला मारहाण केली आणि गोशाळेत डांबून ठेवले होते. हा अपमान सहन न होऊन त्याने विष प्राशन केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हिंमाचल प्रदेशचे काँग्रेस शासन पुन्हा चर्चेत आले आहे. शाहु पुले आंबेडकरांचे नाव घेणार्या काँग्रेसच्या राज्यात अस्पृश्यतेच्या अपमानाने बालकाचा बळी गेला आहे.
आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थानाने मागास समाजाच्या वस्त्यांमध्ये पाच हजार मंदिर उभारण्याच्या घेतलेल्या निर्णयाला आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षांनी विरोध केला आहे. त्याचवेळी आंध्र प्रदेशातील ख्रिश्चन धर्मांतरणावर मात्र त्या मूग गिळून गप्प बसतात. हिंदू धर्मद्वेष हा देशातील काँग्रेसच्या आत्म्याचा स्थायीभाव झाला आहे.
काँग्रेस पक्षाने नागपूर येथून सुरू केलेल्या ‘संविधान सत्याग्रह पदयात्रे’वर भाजप आमदार अमित गोरखे यांनी तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात वेळोवेळी संविधानाचा अपमान केला असून, आज ‘संविधान वाचवण्याचे’ नाटक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भारताच्या दूरसंचार क्षेत्राने गेल्या दोन दशकांत कात टाकली असली, तरीही डिजिटल समावेशनासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. खासगी कंपन्यांच्या तीव्र स्पर्धेत एकेकाळची जनतेची विश्वासार्ह कंपनी ‘बीएसएनएल’ मात्र हळूहळू मागे पडली. काँग्रेस काळातील दुर्लक्ष, तांत्रिक सुधारणा न करण्याची प्रवृत्ती, निर्णयक्षमतेचा अभाव आणि व्यवस्थापनातील त्रुटी यांमुळे ही संस्था डबघाईला आली. अनेकांनी तर ‘बीएसएनएल’ कायमस्वरूपी संपणार, अशी भविष्यवाणीही केली होती. मात्र, आज स्थिती बदललेली आहे. मोदी सरकारने आधुनिकतेची कास धरत, या संस
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने द्वेषपूर्ण पोस्ट करत दंगली भडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत एक्स हॅण्डल विरोधात भाजप महाराष्ट्र प्रवक्ते ॲड. अनिकेत निकम यांनी सोमवार, २९ सप्टेंबर रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी काँग्रेसचे पदाधिकारी मामा पगारे यांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘थ्री इडियट्स’ या प्रसिद्ध हिंदी सिनेमात राजू रस्तोगी, फरहान आणि रणछोडदास चांचड उपाख्य फुन्सुक वांगडू हे मद्यपान करून आपल्या संस्थेच्या मुख्याध्यापकाचे नाव ‘विरू सहस्रबुद्धे’वरून ‘व्हायरस बुढ्ढे’ असे करतात. या सिनेमातील फुन्सुक वांगडू हे पात्र सोनम वांगचुक यांच्यावर बेतलेले असल्याचे म्हणतात. मात्र, सध्या चित्रपटामुळे प्रसिद्धीस आलेले हे वांगचुक लडाखमध्ये ‘व्हायरस’ ठरत असल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना त्यांनी काय दिवे लावले ते महाराष्ट्राला माहिती आहे, असे प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवार, २१ सप्टेंबर रोजी दिले.
काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रात सत्याग्रह यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतू, ही सत्याग्रह यात्रा नसून असत्य यात्रा आहे, अशी टीका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी रविवार, २१ सप्टेंबर रोजी केली.
ज्या पक्षाची राजकारणातील मूल्ये केवळ सत्ता आणि स्वार्थ हीच राहिली असतील, त्या पक्षाची अधोगती झपाट्याने होते. आपल्याला सत्ता मिळत नसेल, तर देशात अराजक माजविण्यासही या पक्षाचे नेते मागेपुढे पाहत नाहीत, हे राहुल गांधी यांच्या कार्यशैलीवरून दिसतच आहे. अशा स्थितीत भारताची सूत्रे एका सच्चा राष्ट्रवादी नेत्याच्या हाती आहेत, हे भारताचे सुदैवच म्हणायला हवे.
मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर उबाठा गटाचे उरलेसुरले अस्तित्व संपणार असून उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे, असा पलटवार भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवार, २० सप्टेंबर रोजी केला.
राहुल गांधी म्हणजे सराईत खोटेपणा आणि माफीवीर आहेत, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांना त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत प्रत्युत्तर दिले.
जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) प्रमुख व सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला दहशतवादी यासीन मलिक याने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. मलिकने दिल्लीतल्या उच्च न्यायालयात दाखल केलेल्या हलफनाम्यात असा दावा केला आहे की, 2006 मध्ये पाकिस्तान दौऱ्यादरम्यान त्याने लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक व 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याची भेट घेतली होती. या भेटीबद्दल त्याने तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन यांना प्रत्यक्ष माहिती दिली
(Sam Pitroda) इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा हे अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. दरम्यान, आता सॅम पित्रोदा यांचं आणखी एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. "मी पाकिस्तानला गेलो होतो, तेव्हा मला घरीच असल्यासारखं वाटलं", असं विधान सॅम पित्रोदा यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे.
एकीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मतचोरीवरून रान पेटवत असताना, कर्नाटकमधील एका काँग्रेस आमदाराची आमदारकी रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे एकीकडे राहुल गांधी मोदी सरकार, निवडणूक आयोगावर मतचोरीवरून कंठशोष करीत असताना, दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील आमदाराने केलेल्या प्रतापांमुळे काँग्रेसवर ‘हाता’ची घडी घालण्याची वेळ आली आहे.
(Rahul Gandhi alleges Chief Election Commissioner Dnyanesh Kumar) काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज (दि. १८ सप्टेंबर) नवी दिल्लीतील इंदिरा भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मतदान प्रक्रियेतील घोटाळ्यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी थेट देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे.
देशातील घटनात्मक संस्थांवर हल्ले करून काँग्रेस नेते राहुल गांधी भारतात बांगलादेश आणि नेपाळसारखे अराजक पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघात भाजपने केला आहे. त्याचवेळी राहुल गांधी यांचा मतचोरीचा नवा आरोपही नेहमीप्रमाणेच निराधार असल्याचा पलटवार केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे करण्यात आला आहे.
नेंपाळमधील ‘जेन-झी’च्या आंदोलनानंतर आता तेथील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. आगीमध्ये सरकारीसह खासगी वास्तूही भस्मसात करणारे तेथील तरुणांचे हातच आता देशभरात स्वच्छता मोहीम राबविण्यात व्यस्त दिसतात. पण, एकीकडे नेपाळची गाडी हळूहळू रुळावर येत असताना, भारतात मात्र तशीच परिस्थिती कशी उद्भवेल, यासाठी राष्ट्रद्वेष्ट्या शक्ती एकाएकी सक्रिय झालेल्या दिसतात. नेपाळमध्ये ज्याप्रमाणे समाजमाध्यमांचा वापर करून सरकारविरोधी वातावरणनिर्मिती करण्यात आली, त्याच रणनीतीचा अवलंब करून, भारतातही अराजक माजवण्याच्या हालचालींना अलीकडे
(Patna High Court on PM Modi's Mother Al video by Bihar Congress) पाटणा उच्च न्यायालयाने बिहार काँग्रेसने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केलेला पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईंचा एआयद्वारे (आर्टीफिशियल इंटेजिन्स) तयार केलेला व्हिडीओ हटवण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात न्यायालयाने राहुल गांधी, भारतीय निवडणूक आयोग, मेटा, गुगल, एक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला नोटीस बजावली आहे.
कर्नाटकातील काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारने अल्पसंख्याक वस्त्यांच्या विकासासाठी तब्बल ३९८ कोटी रुपये खर्च करणार आसल्याचे जाहीर केले. हा वरवर विकासनितीचा भाग दिसत असला, तरीही तो निव्वळ तुष्टीकरणाचा अजेंडाच आहे. कर्नाटकातील २२ मुस्लीमबहुल विधानसभा क्षेत्रांवरच ही रक्कम खर्च होणार असल्यामुळे, सर्वांच्या हक्काचा असलेला करदात्यांचा पैसा विशिष्ट मतपेटीपुरताच वापरला जाणार का, असा प्रश्न जनता विचारू लागली आहे.
संपुआच्या काळात विकास हा कायमच उपहासाचा विषय ठरला. आजवर विविध कारणांचे दाखले देत राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयाकडे काँग्रेसने कायमच कानाडोळा केला. एखाद्या प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या मनात भीती निर्माण करणे यात काँग्रेस आघाडीवर. आताही सोनिया गांधींचा ‘द मेकिंग ऑफ अॅन इकोलॉजिकल डिजास्टर इन द निकोबार’ हा नुकताच इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेला लेख काँग्रेसच्या या अपयशी नीतीचे उत्तम उदाहरण ठरावा.
कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने अल्पसंख्याक वस्त्यांच्या कथित विकासासाठी ३९८ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मुस्लिम तुष्टीकरण’ धोरणाचा भाग म्हणून कर्नाटक सरकारविरोधात तीव्र निषेध व्यक्त होताना दिसतोय. अशी माहिती आहे की, राज्यातील २२ मुस्लिमबहुल विधानसभा क्षेत्रांमध्ये ही रक्कम खर्च होणार आहे. या भागांतील मागासलेल्या वस्ती व मुस्लिम कॉलनींना मॉडेल कॉलनी म्हणून विकसित करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे.
बिहार काँग्रेसकडून टेक्नॉलॉजीचा वापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्रीबाबत सोशल मीडियावर अपमानास्पद पोस्ट व्हायरल करण्यात आल्याचा आरोप करत, भाजपा महिला मोर्चाने आज वसई येथे आचोळे पोलिस ठाण्यासमोर जोरदार निषेध आंदोलन केले.
बिहारमधील वोट अधिकार यात्रा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या आईविषयी अपमानास्पद शब्द वापरल्याप्रकरणी सुरू झालेल्या वादानंतर काँग्रेसने आपल्या एक्स हँडलवर एआय जनरेटेड व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमुळे बिहारचे राजकारण आणखी चिघळले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला बदनाम करण्यासाठी मांडलेला कथित ‘मतचोरी’चा दस्तऐवज प्रत्यक्षात म्यानमारमध्ये तयार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. हा खुलासा झाल्यानंतर काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते, असे म्हणतात. याचा अर्थ काही गोष्टी केल्या, तरी नुकसान होते आणि नाही केल्या तरीही नुकसान होते. उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि महाविकास आघाडी या त्रिकुटाची सध्या अशीच काहीशी चलबिचल अवस्था! विशेषतः उद्धव ठाकरे तर अलीकडे फारच सैरभैर झालेले दिसतात. मनसे की मविआ, असा गहन प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ते सतत धडपडत आहेत. मग कधी ‘शिवतीर्था’वर बैठका, तर कधी ‘मातोश्री’वर बंद दाराआड चर्चा असे सगळे सुरू आहे.
दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची विनंती करणाऱ्य़ा याचिकेवर निकाल राखून ठेवला आहे. याचिकेत असा दावा केला आहे की गांधी यांचे नाव भारतीय नागरिक होण्यापूर्वी, तीन वर्षांपूर्वीच मतदार यादीत समाविष्ट झाले होते.
भारतावर तब्बल ५० टक्के आयातशुल्क लावण्याचा आपला निर्णय चुकला आहे, याची जाणीव ट्रम्प यांना होत आहे. त्याचा विपरीत परिणाम पुढील वर्षी होणार्या काँग्रेसच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षावर होईल, याची जाणीवही त्यांना झाली आहे. याचे कारण त्यांचे सर्वांत मोठे मतदार हे अमेरिकन भारतीय आहेत. त्यांना भारताच्या हिताला बाधा आणणारी धोरणे मान्य होणार नाहीत, हे ट्रम्प यांनी ओळखले आहे.
केशव उपाध्ये यांची टीका ; काँग्रेसचे ओबीसी प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू काँग्रेसची वाटचाल हा ओबीसी समाजावरील अन्यायाचा इतिहास असून काँग्रेसचे ओबीसी प्रेम म्हणजे मगरीचे अश्रू आहेत, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवार, ८ सप्टेंबर रोजी केली. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या शासन निर्णय हा ओबीसी समाजावर अन्याय करणारा असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यावरून सध्या राजकारण तापले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘इंडियन स्टेटशी लढा सुरू आहे’ या वादग्रस्त विधानावर दाखल झालेल्या एफआयआरच्या चौकशीत ओडिशा पोलिसांनी गती दिली आहे. या चौकशीचा धागा आता थेट राजीव गांधी फाऊंडेशन पर्यंत पोहोचला असून, फाऊंडेशनला आर्थिक नोंदी सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
विधानसभा आणि विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये सध्या रस्सीखेच सुरु असल्याचे दिसते. दरम्यान, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी सोमवार, ८ सप्टेंबर रोजी काँग्रेस नेत्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांच्याकडे गळ घातली.
राहुल गांधी–तेजस्वी यादव यांच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींना उद्देशून अपशब्द वापरल्याचा वाद अजून थंडावलेला नाही. तोच काँग्रेसला ‘बीडी ट्विट’ वादाचा नवा फटका बसला आहे. केरळ काँग्रेसच्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये बिहारची तुलना बीडीशी करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. भाजप आणि जदयुने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला असून राजदचे तेजस्वी यादव यांनाही “चूक झाली असेल तर माफी मागावी,” असे म्हटले आहे,
पंजाबमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, या परिस्थितीला पंजाबमधील आम आदमी सरकारचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप पंजाबचे विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा यांनी केला आहे. भगवंत मान यांच्या सरकारने भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ आणि भारतीय हवामान खात्याने वेळोवेळी दिलेल्या धोक्याच्या इशार्याकडे दुर्लक्ष करताना, राजकारण करण्यातच धन्यता मानल्याचा आरोप प्रताप सिंग बाजवा यांनी केला आहे.
केंद्रातील मोदी सरकारने गेल्या ११ वर्षांत मनरेगा योजनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून, या योजनेला सरकारकडून कमी निधी दिला जात असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.मनरेगा योजनेला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारवर आरोप केले
सार्वजनिक टिप्पणीमध्ये आता तर्क आणि वस्तुस्थितीऐवजी वैयक्तिक शिवराळपणाच वाढत चालला आहे. भारतात नरेंद्र मोदी हे बहुसंख्य भारतीयांचे लाडके नेते असले, तरी त्यांच्या विरोधकांच्या दृष्टीने ते खलनायकच आहेत. त्यांच्या कारभारात भ्रष्टाचाराचा अंश नसल्याने त्यांनाच वैयक्तिक स्तरावर बदनाम करण्याचा कट रचला जात आहे. अमेरिकेच्या एका जबाबदार प्रतिनिधीनेही केलेल्या वक्तव्याकडे या व्यापक कटाचा भाग म्हणूनच पाहिले पाहिजे.
भारतीय नागरिकत्व मिळण्यापूर्वीच तीन वर्षांपूर्वी मतदार यादीत नाव समाविष्ट केल्याबद्दल काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याची मागणी करणारी फौजदारी तक्रार दिल्ली न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १० सप्टेंबर रोजी होईल.
पश्चिम बंगाल विधानसभेत गुरुवारी प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. या गोंधळात भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष जखमी झाले.
करप्रणालीला गोंधळातून मुक्त करून ‘एक देश, एक कर’ हे सूत्र मोदी सरकारने प्रत्यक्षात आणले. काँग्रेसने कागदावर ठेवलेला प्रस्ताव सरकारने लागू करण्याचे धारिष्ट्य दाखवले. महसूलवाढ, पारदर्शकता आणि ग्राहक-व्यापार्यांना दिलासा देत ‘जीएसटी’ने भारतीय अर्थव्यवस्थेला नवा श्वास दिला.
एकदा फलाटावरुन गाडी निघून गेली की स्थानकावर उभे राहणे व्यर्थ असते, असे म्हणतात. मात्र, हल्ली राज्यातील विरोधकांची अशीच काहीशी अवस्था. कारण, वेळ निघून गेल्यावरच एखाद्या विषयाच्या मागे ते धडपडताना दिसतात. संबंधित विषय हाताळण्याची संधी असताना त्यावर मूग गिळून गप्प बसायचे आणि नंतर मात्र बोंबा मारत फिरायचे, ही त्यांची जुनीच सवय! या पक्षांच्या यादीत काँग्रेसचा पहिला क्रमांक लागतो.
(PM Narendra Modi hits out at RJD-Congress) बिहारमध्ये काँग्रेसने नुकत्याच संपवलेल्या 'मतदार अधिकार यात्रे'दरम्यान माझ्या आईबाबत अपशब्द वापरण्यात आले. या घटनेमुळे मी व्यथित झालो. या प्रकाराबाबत मी राजद-काँग्रेसला माफ करू शकतो, पण बिहारचे लोक माझ्या आईचा अपमान केल्याबद्दल त्यांना माफ करणार नाहीत", असे प्रतिपादन यावेळी पंतप्रधान मोदींनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी बिहारमध्ये ‘जीविका निधी साख सहकारी संघ’चा शुभारंभ केला आणि महिला स्वयं-सहायता गटांना १०५ कोटी रुपयांचा निधी हस्तांतरित केला. याप्रसंगी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आणि आपल्या दिवंगत आईवर झालेल्या अपमानास्पद वक्तव्यांचा उल्लेख करताना ते भावुक झाले.
राहुल गांधी यांच्या ‘व्होटर अधिकार यात्रे’ची काल सांगता झाली असली, तरी या यात्रेचा प्रभाव हा मर्यादित स्वरुपातच दिसून आला. कारण, मुळात काँग्रेसने केलेले तथ्यहीन आरोप त्यांना सिद्धही करता आले नाही. त्यातच निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनंतर तर राहुल गांधींच्या फसव्या आरोपातील फोलपणा प्रकर्षाने अधोरेखित झाला. त्याचे आकलन...
एकीकडे राहुल गांधी ओबीसी आरक्षणावरून राजकारण करतात. तर दुसरीकडे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या भूमिकेला समर्थन देतात. त्यामुळे सर्वात आधी काँग्रेसने त्यांची नेमकी भूमिका काय, ते स्पष्ट करावे, अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
समाजवादी पार्टी (सपा) आणि काँग्रेसच्या राजवटीत संभलला हिंदूविहिन करण्याचे षडयंत्र आखण्यात आले होते, असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी केला आहे.