मालवणीमध्ये आल्यावर स्वतःच्या घरी आल्यासारखं वाटतं : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

    18-May-2024
Total Views |
 
Lodha
 
मुंबई : मालवणीमध्ये आल्यावर स्वतःच्या घरी आल्यासारखं वाटतं, अशा भावना कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केल्या आहेत. मालाडमधील वॉर्ड ७ मध्ये निवडणुकीच्या दृष्टीने तिथल्या बूथच्या तयारीची पाहणी, नागरिकांच्या सहाय्यासाठी आवश्यक सोयींची पूर्तता आणि नागरिकांशी संपर्क अभियान यासाठी त्यांनी शनिवारी मालाड दौरा केला. यावेळी त्यांनी बूथचे प्रमुख, कार्यकर्ते, शक्ती केंद्र प्रमुख, यांच्यासह बैठक घेतली. तसेच मालवणी भागात घरोघरी जाऊन तेथील हिंदू भगिनी, स्थानिक नागरिक, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांशी संवाद सांधला.
 
यावेळी बोलताना मंत्री लोढा म्हणाले की, "आमचा फतवा म्हणजे भारतमातेची पूजा आहे. येत्या काळात हिंदुस्थान त्यांचाच असेल जे भारतमातेची आराधना करतात आणि या भूमीला वंदनीय मानतात. गेले काही दिवस मी बऱ्याच ठिकाणी फिरतोय पण तिकडून मालवणीमध्ये आल्यानंतर स्वतःच्या घरात आल्यासारखं वाटतं. मालवणीमध्ये झालेल्या प्रत्येक आंदोलनात इकडचा नागरिक नेहमीच खंबीरपणे सोबत उभा राहिला आहे. या आंदोलनांचा परिणाम असा झाला की, मुंबईमध्ये आज कुठेही रोहिंग्या आणि अनधिकृतरित्या राहणारे बांग्लादेशी दिसल्यास लोकं त्यांच्या विरुद्ध उभे राहतात आणि हा आमचा देश आहे तुम्ही इथून निघून जा असे ठणकावून सांगतात," असे ते म्हणाले.