धंगेकरांच्या अडचणी वाढल्या! निवडणूक आयोगात तक्रार दाखल

    10-May-2024
Total Views |
dhangekar
 
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपवरुन रविंद्र धंगेकर यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
रविंद्र धंगेकर यांनी प्रचारादरम्यान आपल्या पत्रकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आलेले घड्याळ चिन्ह छापल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने (अप) निवडणुक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. रविंद्र धंगेकर यांच्या प्रचार पत्रकावर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांची चिन्हे छापली होती. यामध्ये मशाल, पंजा आणि आम आदमी पार्टी सोबत तुतारी ऐवजी घड्याळ चिन्ह छापण्यात आले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रविंद्र धंगेकरांनविरोधात तक्रार दाखल केली आहे.
पुण्यामध्ये येत्या १३ मे ला लोकसभेसाठी मतदान होणार आहे. या मध्ये महायुतीकडुन भाजप नेते आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ उमेदवार आहेत. तर काँग्रेसकडुन कसबा विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर उमेदवार आहेत. त्यांचबरोबर माजी नगरसेवक आणि नुकतेच मनसेला रामराम करत वंचित मध्ये प्रवेश केलेले वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघावर गेली दोन टर्म भाजपचे वर्चस्व आहे. याठीकाणी मागिल निवडणुकीत दिवंगत खासदार गिरीष बापट यांनी ३ लाख ३० हजार मतांनी विजय मिळवला होता.