केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर! 'असा' असेल दौरा
24-May-2025
Total Views | 49
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून दिनांक २५, २६ आणि २७ मे २०२५ असा हा तीन दिवसीय दौरा असेल. या दौऱ्यात ते विविध विकास कामांचे उद्धाटन करणार आहेत. तर अनेक ठिकाणी त्यांच्या सभाही आयोजित करण्यात आल्या आहेत.
असा असेल दौरा!
रविवार, २५ मे रोजी रात्री ९.३० वाजता गृहमंत्री अमित शाह यांचे नागपूर येथे आगमन होईल. त्यानंतर सोमवार, २६ मे रोजी सकाळी ११ वाजता ते जामठा येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेतील 'स्वस्ती निवास'चे भूमिपूजन करतील. दुपारी १ वाजता कामठी तालुक्यातील चिंचोली येथे एनएफएसयूच्या स्थायी परिषदेचे भूमिपूजन आणि परिसराचे ई-उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे.
दुपारी ३ वाजता त्यांचे नांदेड येथे आगमन होईल. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता नांदेडमधील शंकरराव चव्हाण स्मारकातील कुसुम सभागृहात अमित शाह यांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी ५:०० वाजता ते नाना-नानी पार्क औद्योगिक क्षेत्राचे उद्धाटन करणार आहेत. तर ५.३० वाजता नवा मोडा मैदानात त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर रात्री १० वाजता त्यांचे मुंबई येथे आगमन होणार आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच, मंगळवार, २७ मे रोजी सकाळी १०:३० वाजता गृहमंत्री अमित शाह श्री लक्ष्मी नारायण मंदिरातील माधव बागेच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. दुपारी १:०० वाजता स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त मुंबई विद्यापीठातील सर कावसजी जहांगीर सभागृहात त्यांचे विशेष व्याख्यान होणार आहे. त्यानंतर दुपारी २:३० वाजता ते नवी दिल्लीसाठी प्रस्थान करतील.