मुंबई : बांगलादेशातील ढाका येथे झालेल्या विमान अपघातादरम्यान मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी फेसबुकवर पोस्ट करून देशवासीयांना मदतनिधी देण्याचे आवाहन केल्याचे समोर आले. या प्रकरणानंतर सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात बरीच टीका झाली. नेटकऱ्यांनी सुद्धा संताप व्यक्त केला. हे प्रकरण इतके वाढले की शेवटी मोहम्मद युनूस यांना त्यांची फेसबुक पोस्ट डिलीट करावी लागली. विमान अपघातातील पीडितांना मदत करण्यासाठी सरकार असमर्थ असल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद युनूस यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लोकांना मुख्य सल्लागार मदत आणि कल्याण निधीमध्ये देणगी देण्याचे आवाहन केले होते. ही पोस्ट २२ जुलै रोजी मुख्य सल्लागाराच्या अधिकृत पेजवरून लिहिली गेली. 'द डेली स्टार' नुसार, मोहम्मद युनूस यांची ही फेसबुक पोस्ट त्यांचे वरिष्ठ सहाय्यक प्रेस सचिव फयज अहमद यांनी प्रेस विंगच्या अधिकृत व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील शेअर केली. अनेक राजकीय पक्षांसह सामान्य जनतेने या प्रकरणानंतर टीकांचा वर्षाव झाल्याचे दिसून आले.