कल्याण मारहाण प्रकरणातील आरोपी गोपाळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी! न्यायालयातही केली अरेरावी; काय घडलं?
23-Jul-2025
Total Views | 45
मुंबई : कल्याणमधील एका रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरूणीला मारहाण केल्याप्रकरणी गोकुळ झा याला मंगळवार, २३ जुलै रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्याने न्यायालयातही अरेरावी केल्याची माहिती पुढे आली आहे.
याप्रकरणी पीडित तरुणीचे वकील माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरु असताना आरोपीने बुरखा काढला आणि तो अरेरावी करू लागला. पोलिसांना धक्काबुक्की करत होता. त्यावर न्यायाधिशांनी त्याला ताकीद दिली. हा तमाशा बंद कर तुला कोर्टाच्या कामकाजात योग्य त्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यानंतर तो शांत झाला. या आरोपीविरुद्ध मारमारीसह गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याला कायद्याची भीती राहिलेली नाही. पोलिसांनी आरोपीची ७ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. परंतू, न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे," असे त्यांनी सांगितले.
कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात बाल चिकित्सालय रुग्णालयात एका रिसेप्शनिस्ट तरुणीने आरोपी गोकुळ झा याला डॉ क्टरांच्या केबीनमध्ये एमआर बसले आहेत जरा थांबा, असे त्या सांगितले. त्यानंतर संतापून गोकुळ झा याने त्या तरुणीला बेदम मारहाण केली. याप्रकरणी गोकुळ झा आणि त्याच्या भावाला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.