आम्ही एकमेकांचे वैचारिक विरोधक, शत्रू नाहीत! शरद पवार-ठाकरेंनी दिलेल्या शुभेच्छांवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

    23-Jul-2025
Total Views | 34


मुंबई : आम्ही एकमेकांचे वैचारिक विरोधक आहोत, शत्रू नाहीत. त्यामुळे एखाद्याच्या जन्मदिनाप्रसंगी एखाद्याने चांगली भावना व्यक्त करणे याचा अन्यथा अर्थ काढणे अतिशय अयोग्य आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी दिलेल्या शुभेच्छांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रात आम्ही एकमेकांचे वैचारिक विरोधक आहोत, शत्रू नाहीत. त्यामुळे एखाद्याच्या जन्मदिनाप्रसंगी एखाद्याने चांगली भावना व्यक्त करणे याचा अन्यथा अर्थ काढणे अतिशय अयोग्य आहे. महाराष्ट्रात एका चुकीच्या संस्कृतीला आपण पुढे करतो आहोत का, असा याचा अर्थ निघेल. त्यामुळे याला एवढ्याच परिपेक्ष्यात बघितले पाहिजे की, माझ्या जन्मदिनाच्या निमित्ताने काही लोकांनी पुस्तक प्रकाशित केले. त्यांनी महाराष्ट्रातील या दोन्ही मोठ्या नेत्यांना प्रतिक्रिया मागितली. त्यांनी प्रतिक्रिया दिली, त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पण याचा अन्य अर्थ काढणे खूपच संकुचित होईल, असे मला वाटते," असे ते म्हणाले.


मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र नायक’ हे कॉफी टेबल बुक प्रकाशित झाले. या पुस्तकात शरद पवार यांनी लिहिलेल्या लेखात फडणवीस यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहून मला माझा पहिला मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आठवतो. ही गती त्यांनी माझ्या वयापर्यंत कायम ठेवावी आणि ती आणखी वृद्धिंगत होत राहावी, अशी शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त देतो," असे म्हणत शरद पवार यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच "महाराष्ट्राच्या राजकारणात गंगाधरराव फडणवीस यांनी आदर्श राजकारणी म्हणून ठसा उमटवला. हा वारसा देवेंद्र फडणवीस समर्थपणे आणि मेहनतीने पुढे नेत आहेत. भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे," अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.




'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
Bihar election : बिहार निकालावरून मविआत अंतर्गत टीका जोरावर

Bihar election : बिहार निकालावरून मविआत अंतर्गत टीका जोरावर

(Bihar election) नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाले आणि देशभर भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बिहारमध्ये भाजपाप्रणित आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अनेक सभा घेतल्या होत्या.ज्या यशस्वी ठरल्या. आता देखील या निकालानंतर मुंबई बाबत बोलताना 'मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर निवडून येईल',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.तर प्रदेश कार्यालय मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत..

Local Body Election : BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा मोठा निर्णय, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर!

Local Body Election : BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा मोठा निर्णय, ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर!

(Local Body Election) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना, राज्यभरातील अनेक पक्षांकडून निरनिराळे निर्णय घेतले जात आहेत. (Local Body Election) अशातच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने BMC निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर केलेल्या या यादीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. (Local Body ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121